हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील तळीरामांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा होळीच्या दिवशी दारूची दुकाने (Liquor shops) रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजेच, ही दारूची दुकाने इतर वेळेपेक्षा दीड तास उशिरापर्यंत सुरू असतील. याबाबतचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे होळीच्या रात्री तळीराम फुल धिंगाणा घालताना पाहायला मिळणार आहे.
खरे तर होळीच्या दिवशी ड्राय डेच्या शक्यतेमुळे राज्यातील तळीराम काळजीत पडले होते. परंतु त्यांची ही काळजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दूर केली आहे. आता होळीच्या दिवशी दारूची दुकाने इतर वेळेपेक्षा उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत. परंतु असे असतानाही राज्यातील काही महापालिकेच्या क्षेत्रात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे जाहीर केला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी दारूचे दुकाने ठरलेल्या वेळेतच बंद केली जातील. परंतु इतर ठिकाणी 21 मार्च रोजी दारूची दुकाने 12 वाजेपर्यंत उघडी असतील.
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राज्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. खास म्हणजे, होळीच्या सणापूर्वी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून नागरिकांसाठी विविध घोषणाही करण्यात आल्या आहेत. यामुळेच यंदाची होळी सरकारी कर्मचाऱ्यांना चांगलीच फायदेशीर ठरली आहे. यात तळीरामांही होळी झिंगाट साजरी करता यावी म्हणून दारूची दुकाने 21 मार्च रोजी उशिरापर्यंत सुरू राहणार आहे.