सुनील गावस्करानी केले हिटमॅन रोहित शर्माचे कौतुक ; म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माच्या फलंदाजीच भारताचे माजी कर्णधार ‘लिटल मास्टर’ सुनिल गावसकर यांनी तोंड भरुन कौतुक केलं आहे. एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मासारखी फलंदाजी करायला आवडलं असते, असेही गावसकर म्हणाले. ते इंडिया टुडेशी बोलत होते.

रोहित शर्माचे कौतुक करताना सुनिल गावसकर म्हणाले की, त्याकाळीची परिस्थिती आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे मला रोहित शर्मासारखी मनसोक्त फलंदाजी करायला जमलं नाही. कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा जसं पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करतो तशीच फलंदाजी करायला मलाही आवडलं असते. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांविरोधात आरामात खेळणाऱ्या रोहित शर्माचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्याची फलंदाजीची शैली इतरांपेक्षा वेगळी आहे. विराट कोहलीनंतर रोहित शर्मा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, असे गावस्कर म्हणाले.

त्यावेळची असणारी परिस्थिती शिवाय आत्मविश्वासाच्या अभावामुळे मला मनमोकळे पणानं फलंदाजी करताना आली नाही.पण आताच्या नव्या जनरेशनच्या क्रिकेटपटूंना खेळताना पाहून आनंद वाटतो. युवा खेळाडूंची फलंदाजी पाहून आनंद वाटतो, असेही गावसकर म्हणाले.

रोहित शर्मा एकदिवसीय आणि T-20 क्रिकेट मध्ये भारताचा सर्वोत्तम फलंदाज म्हणूज गणला जातो. रोहितच्या नावावर तब्बल 3 द्विशतक आहेत.तसेच T-20 क्रिकेट मध्ये अवघ्या 35 चेंडू मध्ये शतक झळकवणारा रोहित जगातील एकमेव फलंदाज आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment