कराड प्रतिनिधी। विशाल वामनराव पाटील
विद्यार्थ्यांनी शिक्षण होत असताना आणि जीवन जगत असताना आई- वडील आणि गुरुजनांचा मान राखला पाहिजे. सुसंस्कृत विद्यार्थी घडविणे हे सध्याच्या युगात जिकीरीचे काम झाले आहे. विद्यार्थ्यांच्या यशात आई- वडीलांसह शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. विद्यार्थ्यांनी फक्त पैसा कमाविणे एवढाच हेतू न बाळगता शिक्षणाचा वापर सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी करावा, असे प्रतिपादन गुरूवर्य इंद्रजित देशमुख यांनी केले.
वसंतगड (ता. कराड) येथील श्री चंद्रसेन शिक्षण संस्थेच्या श्री. वि. ग. माने हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्या वार्षीक पारितोषिक वितरण व वार्षीक स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक दिलीपराव संकपाळ होते. यावेळी शिवम् प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहूल पाटील, मुख्याध्यापक एच. डी. पाटील, एम. डी. पाटील, संस्थेचे सचिव रघुनाथ नलवडे, हणमंतराव नलवडे, उपाध्यक्ष महिपती कोकरे, शिवाजीराव गायकवाड, चंद्रकांत पाटील, पत्रकार हेमंत पवार, जे. आर. पाटील, तानाजी वाघमारे, मुख्याधापक व्ही. एस. ढवळे, हिम्मतराव थोरात, पै. प्रशांत पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यालयाच्या N.M.M.S. 8 वी, 5 वी स्कॉलरशिप, तसेच इ. 5 वी ते 12 वी गुणवंत विद्यार्थी, तसेच राष्ट्रीय राज्य पातळीवरील खेळाडूंचा सत्कार प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक एम. वाय दिक्षित यांनी केले. आभार अनिल काटकर यांनी मानले. सुत्रसंचालन एस. डी. सुर्वे यांनी केले.