हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या चंदिगड येथील निवासस्थान परिसरात जिवंत बॉम्ब (live bomb) आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती होताच पोलीस तसेच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने बॉम्ब (live bomb) आढळलेला परिसर सील केला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा जिवंत बॉम्ब आढळून आला होता तेथून पंजाब आणि हरियाणा अशा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याचे निवासस्थान जवळच आहे. हा बॉम्ब (live bomb) आंब्याची झाडे असलेल्या परिसरात आढळला आहे. हि जागा पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडपासून 1 किमी अंतरावर तर भगवंत मान यांच्या निवासस्थानापासून 2 किमी अंतरावर आहे.
Bomb found near Punjab CM Bhagwant Mann's house in Chandigarh; bomb squad present at the spot pic.twitter.com/qrDCnBS2IF
— ANI (@ANI) January 2, 2023
या घटनेनंतर येथे पोलीस आणि बॉम्बशोधक पथक दाखल झाले. त्यांच्या मदतीने हा बॉम्ब निकामी करण्यात आला असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. हा बॉम्ब (live bomb) या ठिकाणी कसा आला याचा तपास पोलीस करत आहे अशी माहिती चंदिगडमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संजीव कोहली यांनी दिली आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय