हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल मोबाईल (Mobile) हि अत्यंत गरजेची गोष्ट बनली आहे. एकमेकांना कॉल करणे, मेसेज करणे, फोटो विडिओ सेंड करणे इथपासून ते आता पैसे पाठवण्यासाठी सुद्धा मोबाईल गरजेचा बनला आहे. त्यामुळे मोबाईल शिवाय कोणी राहूच शकत नाही असं म्हणत तरी वावगं ठरणार नाही. अगदी लहान मुलांसापासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड आहे. जर तुम्हाला कोणी म्हंटल कि १ महिना मोबाईल शिवाय राहू शकतो का? तर आपोआपच तुमचं उत्तर नाही असं असेल. पण आज आम्ही तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सुद्धा मोबाईल शिवाय राहण्याचा प्रयत्न कराल. चला तर जाणून घेऊयात….
आइसलँडिक दही ब्रँड ‘सिग्गी’ने लोकांसाठी एक अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. ‘SIGGI’ ने या स्पर्धेला ‘डिजिटल डिटॉक्स प्रोग्राम’ असे नाव दिले आहे. त्यानुसार स्पर्धकांना त्यांचा मोबाईल एक महिना त्यांच्यापासून लांब ठेवावा लागणार आहे. खरं तर ‘ड्राय जानेवारी’ स्पर्धेपासून प्रेरणा घेऊन ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना त्यांचा स्मार्टफोन एका बॉक्समध्ये सुरक्षित ठेवावा लागेल आणि पुढील एक महिना त्याला हात लावावा लागणार नाही. जे स्पर्धक हे करू शकतात, त्यापैकी 10 भाग्यवान विजेत्यांची निवड करून त्यांना बक्षीस दिले जाईल. कंपनीचे असं म्हणणं आहे कि, या स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना सामान्य जगाशी पुन्हा जोडण्याची संधी देत आहे.
आणीबाणीच्या काळात वापरू शकता मोबाईल –
परंतु, समजा इमर्जन्सी लागली तर अशावेळी प्रत्येक स्पर्धकांकडे एक सिम कार्ड आणि फोन असेल. आणीबाणीच्या वेळीच त्याचा वापर करता येईल. तुम्हाला सुद्धा या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ३१ जानेवारीपर्यंत संधी आहे. त्यासाठी SIGGI च्या वेबसाइटवर अर्ज करू शकता. कंपनीचे म्हणणे आहे की ते दारूची नशा सोडवत नाही आहेत तर स्मार्टफोनच्या नशेपासून दूर राहण्यास सांगत आहेत