Liver Damage Signs | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे. लोक वाईट सवयींकडे झुकत चाललेले आहेत. परंतु या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, रात्री जास्त वेळ जागायचे. त्याचप्रमाणे उशिरा उठायचे, धूम्रपान करणे. यांसारख्या सवयीचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होतो. आणि त्यामुळे यकृत खराब होण्याचा धोका वाढलेला आहे. आपल्या शरीरातील सगळेच अवयव खूप महत्त्वाचे आहेत. परंतु यकृत्याला झालेली जखम ही लवकर बरी करता येत नाही. परंतु यकृत खराब झाल्याची लक्षणे जर तुम्हाला वेळी समजली, तर तुम्हाला हा धोकादायक आजार टाळता येईल. त्यामुळे यकृत (Liver Damage Signs) खराब होण्याची नक्की लक्षणे काय आहेत? हे आपण जाणून घेऊयात. ही लक्षणे सहसा रात्री दिसतात, त्यामुळे त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
फॅटी लिव्हरचे किती प्रकार आहेत? | Liver Damage Signs
फॅटी यकृत समस्या सामान्यतः जास्त मद्यपान, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाणे आणि शारीरिक हालचाली न केल्यामुळे उद्भवते. फॅटी लिव्हर रोगाचे दोन प्रकार आहेत. पहिला- अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (AFLD) आणि दुसरा- नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD).
पोटदुखी
लिव्हर खराब झाल्यावर पोटदुखी सुरू होते. जेव्हा यकृत खराब होते तेव्हा त्याची कार्य क्षमता कमी होते. त्यामुळे त्याचा आकारही वाढू लागतो. त्यामुळे यकृतावर दाब वाढून वेदना तीव्र होतात.
त्वचेला खाज सुटणे
यकृतामध्ये काही समस्या असल्यास त्वचेवर खाज येण्याची समस्या असू शकते. खाज येणे, जळजळ होणे किंवा पुरळ उठणे यांसारख्या त्वचेच्या समस्या, विशेषतः रात्रीच्या वेळी, त्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा समस्या गंभीर होऊ शकते.
चक्कर येणे, मळमळ
मळमळ आणि उलट्या सारख्या समस्या देखील यकृत खराब होण्याचे एक प्रमुख लक्षण आहेत. रात्री अशा प्रकारची समस्या उद्भवल्यास, आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामध्ये होणारा विलंब धोकादायक ठरू शकतो. यामुळे यकृत आणि आरोग्य या दोन्ही समस्या उद्भवू शकतात.
मूत्र रंगात बदल
लघवीचा रंग बदलणे हे यकृत खराब होण्याचे लक्षण आहे. जेव्हा यकृत खराब होते तेव्हा शरीरातील बिलीरुबिनची पातळी वाढते, ज्यामुळे लघवीचा रंग गडद पिवळा होतो. असे झाल्यास, आपण ताबडतोब डॉक्टरांशी बोलणे आवश्यक आहे.
सूज येणे | Liver Damage Signs
रात्री पायांच्या खालच्या भागात सूज येत असेल तर सावध राहावे. जास्त सूज आणि वेदना यकृताशी संबंधित समस्यांचे लक्षण आहेत. या स्थितीकडे दुर्लक्ष केले जाऊ नये आणि त्वरित तपासले पाहिजे.