Liver Damage Symptomps | लिव्हर खराब झाल्यास रात्री दिसतात ही लक्षणे; दुर्लक्ष केल्यास पडेल महागात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Liver Damage Symptomps | आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा असतो. प्रत्येक अवयवाचे एक वेगळे काम असते. परंतु त्या अवयवाला काही इजा झाली, तर बाकी शरीरावरील नियंत्रण बिघडते. त्यातही लिव्हर (Liver Damage Symptomps) हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा असा अवयव आहे. लिव्हर हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर काढून टाकण्याचे काम करत असते. त्यामुळे आपली पचनक्रिया देखील चांगली होते. तसेच शरीरात ब्लड सेल्स वाढतात. परंतु आजकाल लोकांनी चुकीची लाईफस्टाईल आत्मसात केलेली आहे. त्यामुळे अगदी कमी वयातच लिव्हर संबंधित गंभीर आजारांना लोकांना सामोरे जावे लागतात.

लिव्हर खराब (Liver Damage Symptoms) होण्याची वेगवेगळी लक्षण असतात. आणि यातील काही लक्षणे ही रात्रीच्या वेळेस दिसतात. परंतु आपण अनेक कारणे काढून याकडे दुर्लक्ष करतो. परंतु हीच हेच दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रात्री झोपताना लिव्हर संबंधित काय काय लक्षणे दिसतात.

झोप मोड होणे |Liver Damage Symptomps

एकदा झोपल्यावर जर तुम्हाला सारखी सारखी जाग येत असेल, तर हे देखील एक लिव्हर खराब होण्याचे लक्षण आहे. तुमचा लिव्हर खराब असेल, तर तुम्हाला झोपे संबंधी अनेक समस्या उद्भवतात. तुम्हाला नीट झोप लागत नाही किंवा झोप लागली तरी पुन्हा पुन्हा जाग येते.

शरीराला खाज येणे

रात्रीच्या वेळी जर तुमच्या शरीराला खास येत असेल, तर हे देखील एक लिव्हर खराब होण्याचे लक्षण असते. ज्यावेळी तुमचे लिव्हर व्यवस्थित काम करत नाही. म्हणजेच तुमच्या शरीरातील काही विषारी पदार्थ हे शरीराबाहेर टाकले जात नाही. त्यावेळी तुमच्या शरीरात पित्ताचे प्रमाण वाढते आणि यामुळेच तुमच्या शरीरावर खाज येण्याची समस्या निर्माण होते.

सूज येणे

तुमचा जर लिव्हर खराब झाला असेल, तर तुमचा पाय त्याचप्रमाणे टाचांना रात्रीच्या वेळी सूज येते. जर तुम्हाला देखील केवळ रात्रीच्या वेळी पाय सुजलेले वाटत असेल, तर त्याकडे आजिबात दुर्लक्ष करू नका. तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.

मळमळ आणि उलटी होणे

जर रात्रीच्या वेळी तुम्हाला जास्त मळमळ आणि उलटीची समस्या येत असेल, तर हा देखील तुमचा लिव्हर खराब झाल्याचा एक खूप मोठा संकेत असतो. त्यामुळे दुर्लक्ष करू नका.

लघवीचा रंग पिवळा होणे

तुमचा जर लिव्हर खराब होत असेल, तर तुमच्या लघवीचा रंग हा जास्त गडद पिवळा दिसतो. शरीरात बिलारुबीन हे द्रव्य वाढते. हे द्रव्य लिव्हरद्वारे तयार केले जाते त्यामुळे तुमच्या लघवीचा रंग पिवळा होतो.

लिव्हर खराब होण्याची कारणे |Liver Damage Symptomps

  • जास्त मद्यपान करणे
  • वायरल हेपेटायटिस
  • लठ्ठपणा
  • डायबिटीज
  • हाय ब्लड प्रेशर
  • सतत औषधांचे सेवन करणे