Loan From UPI : UPI वरून कर्ज घेणं झालं सोप्प; फक्त फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Loan From UPI) आजकाल अनेक बँकांनी लोन देण्याची प्रक्रिया अगदी सोप्पी आणि सुलभ केली आहे. त्यामुळे आता कर्ज घेणे बरेच सोपे झाले आहे. अनेक बँकांसह फिनटेक कंपन्यादेखील मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून अगदी कमी वेळात आणि कमी कागदपत्रांवर लगेच कर्ज उपलब्ध करून देतात. अशातच आता UPI शी लिंक असलेल्या क्रेडिट लाइनवरूनदेखील त्वरित कर्ज मिळण्याची सुविधा सुरु झाली आहे. त्यामुळे आता अनेक युजर UPI ॲपच्या मदतीने अगदी सहज कर्ज घेऊ शकतात. याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

‘या’ UPI ॲपच्या मदतीने मिळणार झटपट कर्ज (Loan From UPI)

गेल्या काही काळात UPI ॲपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच UPI ॲपच्या मदतीने कर्ज घेण्याची सुविधा सुरु झाल्याने अनेक वापरकर्त्यांना याचा फायदा होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनने (NPCI) या सुविधेची सुरुवात केली आहे. कर्ज देणाऱ्या UPI ॲपच्या यादीत BHIM, PayZap, Paytm, ZeePay यांचा समावेश आहे.

UPI ॲपच्या मदतीने कर्ज देण्याची सुविधा सुरु झाली असून यामध्ये कर्जाची रक्कम आगाऊ ठरवली जाते. यामध्ये, बँका किंवा वित्तीय संस्था युजर्सच्या क्रेडिट क्षमतेवर आधारित कर्जाची रक्कम आधीच ठरवतात. त्यामुळे UPI युजर कर्जाची रक्कम UPI ॲपच्या मदतीने खरेदीसाठी वापरू शकेल. (Loan From UPI) यामुळे कर्जाची रक्कम आधीच वापरकर्त्यासाठी उपलब्ध होईल. तसेच एखाद्याला कर्जासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेतून जाण्याची आणि त्यानंतर कर्ज मंजुरीसाठी कोणत्याही प्रकारे प्रतीक्षा करण्याची गरज उरत नाही.

कोणासाठी फायदेशीर?

होम क्रेडिट इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी यांनी UPI च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्ज सुविधेबाबत महत्वाची माहिती प्रदान केली आहे. (Loan From UPI) यावेळी त्यांनी सांगितले की, ‘आता UPI वापरकर्ते विशेषत: कमी उत्पन्न गटातील लोक त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच आणीबाणी, शिक्षण, आरोग्यसेवा किंवा व्यावसायिक उपक्रमाशी संबंधित आर्थिक गरजांसाठी UPI च्या माध्यमातून सहज कर्ज मिळवू शकतात. मुख्य म्हणजे, यासाठी त्यांना काहीही तारण ठेवण्याची किंवा कोणतीही कागदपत्रे जमा करण्याची आणि कर्ज मंजुरीच्या प्रतिक्षेची वाट पहावी लागणार नाही’.

कर्ज मिळण्याची प्रक्रिया

प्रत्येक UPI खाते हे बचत खात्याशी जोडलेले असते. त्यामुळे UPI वर क्रेडिट लाइनचा लाभ घेण्यासाठी युजर्सला त्यांच्या बँकेत एक अर्ज सबमिट करावा लागेल. ज्यामध्ये युजरशी संबंधित आर्थिक माहितीचा पुरवठा केला जाईल. यात युजरचे आर्थिक उत्पन्न, क्रेडिट स्कोअर आणि परतफेडीचा इतिहास अशा माहितीचा समावेश असेल. (Loan From UPI) दरम्यान, बँकेच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला उत्पन्न विवरणपत्रे, ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतील. या कागदपत्रांच्या तपासणीनंतर बँक क्रेडिट लाइन त्वरित कर्ज मंजूर करेल. हे कर्ज क्रेडिट कार्डच्या क्रेडिट मर्यादेसारखे असेल. त्यावरील व्याज दर बँकेनुसार वेगवेगळे असू शकतात.