Loan Waiver For Farmers : शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? सरकारकडून हालचाली सुरु

Loan Waiver For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला दर महिन्याला १५०० रुपयांची भेट देऊन शिंदे सरकारने महिलावर्गाला आकर्षित केलं आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं कर्ज माफ (Loan Waiver For Farmers) करून राज्यातील बळीराजाला खुश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरु असून जवळपास 938 आदिवासी सोसाट्यांमध्ये शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने हा निर्णय घेतल्यास राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न- Loan Waiver For Farmers

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला दणका बसला होता. शेतकऱ्यांचे प्रश्न, कांद्याचे प्रश्न आदी कारणांमुळे सरकारला बळीराजाच्या रोषाला सामोरे जावं लागलं होते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा फटका बसू नये यासाठी शेतकऱ्यांना खुश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून जवळपास 938 आदिवासी सोसाट्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल असं बोलले जातंय. सरकार कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून यासंदर्भात हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. जर कर्जमाफीची घोषणा झाली तर शेतकऱ्यांसाठी हि मोठी आनंदाची बाब असेल.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल (Loan Waiver For Farmers) एक वक्तव्य केले होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी आम्ही सरकारकडे विनंती केली आहे. केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा उचलून 3 लाख रुपयांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का, याची माहिती सरकार गोळा करत आहे. सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते. त्यामुळे आता खरंच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी मागच्या महीनाभरातच मोफत वीज योजना, कापूस आणि सोयाबीनसाठी हेक्टरी ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. आता थेट शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाल्यास शिंदे सरकारचा हा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक ठरेल असं म्हंटल जातंय.