नवी दिल्ली । देशातील प्रत्येक हाताला काम देण्यासाठी केंद्र सरकार नोकऱ्या देण्यापेक्षा स्वयंरोजगारावर जास्त भर देत आहे. संपूर्ण आयुष्य नोकरीत घालवण्यापेक्षा लोकांनी स्वतःचा व्यवसाय करून इतरांना रोजगार द्यावा, यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. यामध्ये रोजगाराशी संबंधित कोणतेही प्रशिक्षण, प्रोत्साहन, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि रोजगार निर्मितीसाठी आर्थिक मदत यांचा समावेश होतो.
अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना. या योजनेत लहानांपासून मोठ्या व्यवसायासाठी लोन दिले जाते. व्यवसायाची स्थिती पाहता, पीएम मुद्रा योजना तीन कॅटेगिरीजमध्ये विभागली गेली आहे – पीएम मुद्रा शिशु योजना, पीएम मुद्रा किशोर योजना आणि पीएम मुद्रा तरुण योजना.
प्रधानमंत्री मुद्रा योजना 8 एप्रिल 2015 रोजी लाँच करण्यात आली. ही योजना नॉन कॉर्पोरेट, बिगरशेती लघु/लघु उद्योगांना 10 लाखांपर्यंत लोन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनांद्वारे तुम्ही 50,000 ते 10 लाख रुपयांचे लोन सहज आणि अतिशय स्वस्त व्याजदरात घेऊ शकता.
पीएम मुद्रा शिशू योजनेत 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज, पीएम मुद्रा किशोरमध्ये 50,000 ते 5 लाख रुपये आणि पीएम मुद्रा तरुण योजनेमध्ये 5,00,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे लोन उपलब्ध आहे. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 2021-22 मध्ये आतापर्यंत 1,23,425.40 कोटी रुपयांपर्यंतचे लोन देण्यात आले आहे.
तुम्ही मुद्रा योजनेच्या http://www.mudra.org.in या वेबसाइटवरून या योजनेबाबतची तपशीलवार माहिती मिळवू शकता किंवा तुमच्या जवळच्या बँकेतूनही याविषयीची माहिती गोळा करू शकता.
पीएम शिशु मुद्रा लोन (PM shishu mudra loan)
तुम्हाला तुमचा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा जुने काम वाढवण्यासाठी कमी रक्कम हवी असेल तर ही योजना तुमच्यासाठी आहे. तुम्ही प्रधानमंत्री शुशी मुद्रा लोन योजनेअंतर्गत 50,000 रुपयांचे लोन घेऊ शकता.
शिशू मुद्रा लोन योजनेंतर्गत, एखाद्या व्यक्तीला दुकान उघडणे, रस्त्यावरील विक्रेत्यांप्रमाणे व्यवसाय करणे यासारख्या छोट्या कामासाठी 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
या योजनेअंतर्गत छोटे कारखानदार, कारागीर, फळ-भाजी विक्रेते, दुकानदार, शेती व्यवसायाशी संबंधित व्यक्ती इत्यादींना कर्जासाठी अर्ज करता येईल. कर्जाबाबत अधिक माहिती http://www.udyamimitra.in या संकेतस्थळावरून मिळू शकते. तुम्ही या लिंकवरून पीएम शिशु मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज मिळवू शकता- पीएम शिशू मुद्रा लोन
हे लोन एका वर्षासाठी दिले जाते आणि जर तुम्ही या कर्जाची वेळेवर परतफेड केली तर तुम्हाला व्याजदरातही सूट मिळते. पीएम शिशू मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्यासाठी जामीनदाराची आवश्यकता नाही. कोणतेही फाइलिंग चार्ज भरावा लागणार नाही. होय, व्याजदर बदलू शकतात. हे बँकांवर अवलंबून आहे. असे असले तरी, या योजनेंतर्गत वार्षिक 9 ते 12 टक्के व्याजदर आहे.