कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या विक्री विरोधात जिल्हा पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाईची मोहीम राबविली आत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धडक कामगिरी करत मायणी, ता. खटाव जि. सातारा येथील अभयारण्य समोरन गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या जाकिर गुलाब मुजावर (वय ४१, रा . सांगोला जिल्हा सोलापूर) याला अटक केली. तसेच त्याच्याकडून सुमारे 2 लाख 55 हजार 600 रुपये किमतीचा 10 किलो 224 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांनी अंमली पदार्थ गांजा याची विक्री, लागवड, वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाया करण्याच्या सुचना वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले.
दरम्यान, दि. ६ रोजी परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे यांना एक इसम मायणी येथील अभयारण्यसमोर अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, बंडुज पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने व अंमलदार यांनी जाकिर गुलाब मुजावर (वय ४१, रा . सांगोला जिल्हा सोलापूर) याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून सुमारे २ लाख ५५ हजार ६०० रुपये किमतीचा १० किलो २२४ ग्रॅम गांजा आढळून आला. त्यानंतर त्याच्याविरुध्द बडुज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३४२ / २०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, अमोल माने, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, मोहन नाचण, संजय शिर्के, विजय कांबळे, अमित सपकाळ, गणेश कापरे, प्रविण पवार, अनिल खटावकर, राजीव कुंभार, रुद्रायण राऊत तसेच बडुज पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सत्यवान खाडे, शिकलगार, दयाबा नरळे, दत्तात्रय काळे यांनी कारवाई केली. कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, दहिवडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी अभिनंदन केले आहे.