पुणे | सुनिल शेवरे
भारतरत्न एम्. विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने असोसिएशन फॉर सिव्हिल इंजीनियर्स डेवलपमेंट संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक १५ सप्टें २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता कमिन्स सभागृह नवी पेठ येथे होणार असल्याची माहिती एसीईडी चे संस्थापक सदस्य प्रकाश भट, चेअरमन अशोक रेटवड़े यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी निखिल शहा,गोविंद देशपांडे,सतीश,यंबल,विलास भोसले, प्रवीण मुंडे उपस्थित होते.
भट म्हणाले ” प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना घर मिळावे या विषयी योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ प्रविणकुमार देवरे, पुणे महापालिका प्रधानमंत्री आवास योजना विभागाचे सहसंचालक दिनेश रोकड़े मार्गदर्शक करणार आहेत. तसेच हौसिंग फॉर ऑल आणि कंस्ट्रक्शन सेक्टर स्टार्टअप या विषयावर पेपर प्रेजेंटेशन एनोव्हेटिव्ह आयडिया या दोन स्पर्धांचं आयोजन केले आहे. या स्पर्धामध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख २० सप्टें २०१८ आहे. दोन्ही स्पर्धेतील प्रथम व द्वीतीय क्रमांकाच्या विजेत्याला २९ सप्टें रोजी ५०,००० व २५००० रोख पारीतोषिक देण्यात येईल.