हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे-लोणावळा प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता पुणे ते लोणावळा लोकल रेल्वे (Local Train) सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच लोणावळा रेल्वे स्थानकावर स्थानिकांनी ट्रेन अडवून आंदोलन केले होते. पुणे ते लोणावळा लोकल सेवेला पुन्हा सुरू करण्यात यावे, ही लोकल बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत असे स्थानिकांनी म्हटले होते. या आंदोलनानंतरच लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बुधवारपासून प्रवाशांच्या सेवेत पुणे ते लोणावळा लोकल रेल्वे (Local Train) सुरू झाली आहे. यामुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ही लोकल रेल्वे 1 फेब्रुवारीपासून दुपारच्या वेळी नियमितपणे धावणार आहे. कोरोना काळावेळी पुणे लोणावळा दुपारच्या दरम्यान सुरू असलेले लोकल रेल्वे बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना पुणे ते लोणावळा असा प्रवास करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. याबाबतची तक्रार अनेकवेळा रेल्वे विभागाकडे करण्यात आली होती. मात्र त्याकडे कोणी लक्ष दिले नाही.
लोकलचे (Local Train) वेळापत्रक कसे असेल?
शेवटी गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर लोकल सेवा (Local Train) सुरू करण्यासाठी स्थानिक आणि प्रवाशांनी आंदोलन केले होते. संतप्त स्थानिक आणि प्रवाशांनी डेक्कन क्वीनच्या इंजिनवर चढून रेल्वे विभागाविरोधात हे लोकल सेवा पूर्ण सुरू करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतरच आजपासून पुन्हा लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. ही लोकल शिवाजीनगर स्थानकातून दुपारी 12.5 वाजता सुटेल. 12.45 वाजता ती लोणवळा रेल्वे स्थानकात पोहोचेल. यानंतर 11.20 वाजता ती लोणावळा स्थानकातून सुटेल. नंतर 1.20 वाजता लोकल शिवाजीनगर स्थानकावर पोहोचेल.