आंबेडकर जयंती साजरी करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं ‘हे’ आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. सरकारकडून लोकांना घरातच बसण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर जयंती आणि फुले जयंती साजरी करण्याबाबत एक महत्वाचं आवाहन राज्यातील जनतेला केला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा आंबेडकर आणि फुले जयंती घरातच साजरी करा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “११ एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती आहे आणि १४ एप्रिलला आंबेडकर जयंती आहे. दरवर्षी दोन्ही जयंती एकत्रित साजरी केली जाते. यावर्षी कोरोना व्हायरसने भारतासह जगाला भेडसावलं आहे. त्यामुळे लोक चिंतीत आहे. कोरोना व्हायरसला रोखायचं असेल तर अंतर ठेवून वागायचं. मी सर्व फुले, शाहू, आंबेडकरी जनतेला आवाहन करतो, यंदा जयंती घरातच साजरी करावी. जयंती कशी साजरी केली याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करुन सांगा. परंतु महात्मा फुले आणि बाबासाहेबांची जयंती सार्वत्रिक होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे.”

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आंबेडकर जयंती आणि फुले जयंती घरातच साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय विधानपरिषदेचे सदस्य प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी आंबेडकर जयंती घरातच कुटुंबासोबत साजरी करण्याची विनंती केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी राज्यातील नेत्याकडून हे आवाहन करण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यात आज २३ नवे करोनाग्रस्त, राज्यातील आकडा पोहोचला ८९१ वर

१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क घालून स्वतःच चालवली गाडी

मिस इंग्लंडचा मुकुट उतरवून ‘ही’ भारतीय सुंदरी बनली डाॅक्टर

Leave a Comment