मुंबई । ठाकरे सरकारने राज्यात लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची होणार वाढ आणि संसर्ग यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करणार नसल्याचं म्हटलं होतं. राज्यात हळूहळू शिथिलता आणली जाईल असं त्यांनी जनतेला संबोधित करत असताना म्हटलं होतं. दरम्यान या लॉकडाउन दरम्यान आपल्याला कुठल्या नियमांच पालन करावं लागणार आहे, चला तर जाणून घेऊयात.
१) सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी आणि वाहतुकीच्यावेळी चेहऱ्यावर मास्क घालणे बंधनकारक आहे.
२) सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर राखणे सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक आहे.
३)दुकानात गेल्यानंतर ग्राहकांमध्ये योग्य अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. एकाच वेळी पाचपेक्षा जास्त लोकांना परवानगी देऊ नये.
४)मोठया संख्येने लोकांना एकत्र जमता येणार नाही. लग्नसमारंभाला परवानगी आहे. पण पाहुण्यांची संख्या ५० पेक्षा जास्त नसावी.
५) अंत्यविधीच्यावेळी सुद्धा ५० पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही.
६)सार्वजनिक ठिकाणी दारु, पान आणि तंबाखू खायला मनाई आहे.
७)सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
८)कामाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर व बाहेर निघण्याच्या मार्गावर थर्मल स्क्रिनिंग करावे लागेल तसेच हँड वॉश, सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.
९)कामावर मानवी संपर्क येणाऱ्या प्रत्येक ठिकाणाची सतत स्वच्छता करावी लागेल.
१०)कर्मचाऱ्यांच्या शिफ्टच्या वेळा तसेच कामावर असताना कर्मचाऱ्यांमध्ये योग्य अंतर ठेवण्याची जबाबदारी प्रमुखाची असेल.
११) ३१ मे आणि ४ जून २०२० च्या मार्गदर्शक तत्वांनुसार बिगर जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”