लॉकडाउन उठताच वाढू शकतात पेट्रोल-डिझेलचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे बरेच देश लॉकडाऊनमध्ये आहेत. बर्‍याच देशांमध्ये लॉकडाउन कालावधी २१ दिवस किंवा त्याहून अधिक असू आहे . अशा परिस्थितीत, परिवहन सेवा देखील खूप कमी झाल्या आहेत. ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी कमी झाली आहे त्यामुळे तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. तेलाच्या किंमती खाली येण्याचे सर्वात मोठे कारण, जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने कच्च्या तेलाची किंमत गेल्या १८ वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेली आहे.जे चांगले नाही.

१ एप्रिलपासून संपूर्ण देशात बीएस ६ इंधन सुरू झाले आणि त्याच दिवशी या तीन राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. कोलकातामध्ये, जेथे पेट्रोलच्या किंमतीत १.०१ रुपयांची वाढ झाली तर डिझेल १ रुपयांनी महाग झाले. बंगळुरूमध्ये पेट्रोलचा दर १.५८ रुपयांनी वाढून ७३.५५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर १.५५ रुपयांनी वाढून ६५.९६ रुपये झाला. जयपूरमध्ये किंमत २.२४ रुपयांनी वाढून ७५.५९ रुपये आणि डिझेल २.१५ रुपयांनी वाढून ६९.२८ रुपये इतका झाला.

तेलाच्या विपणन कंपन्यांकडून किंमतीत वाढ केली जात नाही, परंतु या वाढीमागील कारण म्हणजे या राज्यांद्वारे पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट वाढविणे होय. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ६९.५९ रुपये आहे, तर एक लिटर डिझेलची किंमत ६९.२९ रुपये असू शकते. यासह कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ७३.३० रुपये आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमत प्रति लिटर ६५.६२ रुपये आहे, मुंबईत पेट्रोलची किंमत ७५.३० रुपये प्रति लीटर आहे. डिझेल प्रति लिटर ६५.२१ रुपये दराने असू शकेल. याशिवाय चेन्नईत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ७२.२८ रुपये आहे. डिझेलची किंमत ६५.७१रुपये प्रतिलिटर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment