लॉकडाऊन काळात अफवांचा बाजार तेजीत; ३९ आरोपींना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोरोनामुळं राज्यातील दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक बनत चहाला आहे. लोकांच्या मनात बऱ्याच शंका आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि संचारबंदीचे कडक होत चालले नियम यामुळं नागरिकांमध्ये संभ्रम आहे. लोकांच्या याच संभ्रमाचा फायदा घेत काही समाजकंटक अफवा, खोट्या बातम्या, द्वेषयुक्त भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवत आहेत. या सर्व प्रकारांवर महाराष्ट्र पोलिस दलातील सायबर विभाग करडी नजर ठेऊन आहे. त्यानुसार लॉकडाऊन सुरू होण्यापासून आजपर्यंत महाराष्ट्र सायबर विभागाने सोशल मीडियावर बनावट बातम्या, अफवा व द्वेषयुक्त भाषणांविषयी १६१ गुन्हे दाखल आहेत.

महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाच्या आकडेवारीनुसार, बीडमध्ये सर्वाधिक २२ घटना नोंदविण्यात आल्या असून त्यापाठोपाठ कोल्हापूर १२ , पुणे ग्रामीण १२, मुंबई ११ आणि जळगाव १० इतरांमध्ये नोंद झाली आहे. गुन्हेगार प्रामुख्याने कोरोनाचा आजार आणि त्यावरील उपचारांबद्दल अफवा पसरवत असल्याचे आढळले आहे. द्वेषयुक्त भाषणांच्या बाबतीतही एकूण नोंदवलेल्या प्रकरणांपैकी ७३ प्रकरणे सोशल मीडियावर द्वेषयुक्त भाषणाविषयी आहेत. एकूण ३९ आरोपींना अटक करण्यात आली आणि ३३ जणांची ओळख पटली आहे. गेल्या ४८ तासांत सोशल मीडिया आणि इतर ऑनलाईन मेसेजिंग कोरोना साथीच्या आजाराबद्दल बनावट बातम्या, अफवा आणि द्वेषयुक्त भाषणांबद्दल महाराष्ट्रात एकूण ३० एफआयआर नोंदविण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

Leave a Comment