३ महिने EMI भरू नका सांगता पण त्यावर व्याज कसे काय घेताय?; सुप्रीम कोर्टाचा केंद्र, RBI ला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने या काळात अनेकांचे उत्पन्न बंद झाले आहे. अनेक उद्योगधंदे बंद आहे. तर अनेकांच्या हाताला काम नाही. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)  कर्जाचे हफ्ते (EMI) ३१ ऑगस्टपर्यंत न भरण्याची मुभा दिली आहे. मात्र बँकांनी कर्जाचे हफ्ते पुढे ढकलण्याची मुभा दिली असली तरी त्यावरील व्याज मात्र वसूल केले जाणार आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.याचिकेत बँकांनी हफ्ते माफ करण्यात आलेल्या काळात व्याजदेखील माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने तीन महिने कर्जाचा हप्ता भरु नका सांगता आणि व्याज घेता, हे कसे काय, असा सवाल उपस्थित केला. न्यायमूर्ती जे अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे.

न्यायमूर्तींनी सुनावणीवेळी वित्त मंत्रालय आणि आरबीआयला विचारणा केली की, जर तुम्ही ३ महिन्यांसाठी कर्ज माफ केले आहे तर मग तुम्ही त्यावर व्याज कसे काय घेऊ शकता, असा सवाल उपस्थित केला. ही आमची काळजी आहे. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी आपल्याला यासंबंधी आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करावी लागेल असे सांगितले. SBIच्यावतीने न्यायालयात बाजू मांडणारे वरिष्ठ वकील रोहतगी यांनीही आरबीआयशी चर्चा करणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने १७ जूनपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे.

 

दरम्यान, आरबीआयने व्याज माफ केले तर बँकांना खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, सांगितले आहे. बँकांवर दोन लाख कोटींचा बोजा वाढेल, असे म्हटले आहे. तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयाला सादर केले आहे. दरम्यान, २५ मार्च रोजी आरबीयने कर्जाचे हफ्ते न भरण्यासाठी तीन महिन्यांची मुभा देल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २२ जून रोजी आणखी तीन महिन्यांसाठी ही सवलत जाहीर करत ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment