Lok Sabha Election 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार १३ मार्च नंतर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होत्या. मात्र आता इंडिया टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, येत्या १३ मार्चनंतर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. यंदाची लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 7-8 टप्प्यात मतदान होऊ शकतात.
निवडणुकीच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी निवडणूक आयोग अनेक राज्यांना भेटी देत आहे. आणि एकदा हे काम पूर्ण झाले कि मग लगेच निवडणूक कार्यक्रमाच्या तारखांची घोषणा केली जाईल. केंद्रीय निवडणूक मंडळाचे अधिकारी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरला भेट दिली जाणार आहे. देशातील सर्व राज्याचा दौरा 13 मार्चपूर्वी पूर्ण होणार आहे. त्यानंतरच आयोग लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल. आयोग गेल्या काही महिन्यांपासून सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) नियमित बैठका घेत आहे. निवडणुकीवेळी कुठे काय अडचण आहे? त्यासंबंधित समस्या क्षेत्रे, ईव्हीएम मशीनबाबत अपडेट्स, सुरक्षा दलांची लागणारी आवश्यकता,या गोष्टींकडे लक्ष्य दिले जात आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोग यंदाच्या लोकसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा वापर करणार आहे.
देशात INDIA Vs NDA सामना – Lok Sabha Election 2024
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपप्रणीत NDA आणि विरोधकांच्या INDIA आघाडीमध्ये थेट सामना पाहायला मिळणार आहे. NDA मध्ये JDS, अकाली दल , HAM, JDU, LJP, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), NPP, RLJP, , AGP, निषाद पार्टी, MNF या राजकीय पक्षांचा समावेश आहे. भाजपविरोधी INDIA आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ), आरजेडी, समाजवादी पार्टी, सीपीएम, डीएमके, सीपीई, , जेएमएम, आझाद समाज पक्ष, सीपीआय (सीपीआय) यांचा समावेश आहे. ML ), UML, KMDK, MKK, MDMK, VCK, JKPD, PWP या पक्षांचा समावेश आहे.