मोदी नाही ना पवार नाही ‘ हा ‘ नेताच होऊ शकतो पंतप्रधान ; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |शरद पवार ,ममता बानर्जी ,मायावती, चंद्राबाबू नायडू यांची नावे पंतप्रधान पदासाठी चर्चेत असली तरी शरद पवार यांचेच नाव सध्या अधिक चर्चेत आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांना शरद पवार पंतप्रधान पदाच्या लायक वाटत नाहीत. म्हणून त्यांनी देखील आपला पंतप्रधान पदावरच अंदाज व्यक्त केला आहे.

भारताचा पुढील पंतप्रधान राहुल गांधी अथवा नरेंद्र मोदी होऊ शकत नाही. तर देशाचा पुढील पंतप्रधान हे जेडीएसचे नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडाच होऊ शकतात असा अंदाज प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला आहे.

शरद पवारांना मी पंतप्रधान पदाच्या लायक मानत नाही तर ममता बनर्जी आणि चंद्राबाबू नायडू हे कधीच पंतप्रधान होऊ शकत नाहीत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यात २१ मे रोजी नवी दिल्लीत महाआघाडीचा पंतप्रधान कोण असेल या संदर्भात महाआघाडीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नाव निश्चित करून निकालाची वाट बघण्याचा महाआघाडीचा इरादा आहे.

Leave a Comment