टिळकांनी पुण्यातील ‘या’ ठिकाणी स्थापन केला पहिला सार्वजनिक गणपती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र |सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याला लोकमान्यांनी ‘केसरी’तून जोरदार प्रोत्साहन दिले असले तरी टिळकांनी स्वत: एखादे मंडळ स्थापले नाही. ज्या वाडय़ात टिळक रहात होते. त्या विंचुरकर वाडय़ात लोकमान्यांनी १८९४ साली पहिला सार्वजनिक गणपती स्थापन केला. येथे टिळक लॉ क्लासेस घ्यायचे, त्यामुळे सुरुवातीला हा ‘लॉ क्लासचा गणपती’ म्हणून ओळखला जायचा. नंतर लोकमान्य विंचुरकर वाडा सोडून १९०५ साली गायकवाड वाडय़ात राहायला आले, तसे हा उत्सवदेखील त्यांच्याबरोबर गायकवाड वाडय़ात आला. लोकमान्यांचे वास्तव्य याच वाडय़ात अनेक वर्षे होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार हा उत्सव सांभाळण्याची जबाबदारी ‘केसरी’ संस्थेकडे देण्यात आली.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शताब्दीच्या आधी दोन वर्षे बाळासाहेब भारदे, प्रभाकर कुंटे आणि रवींद्र पाठारे यांनी टिळक प्रस्थापित प्रथम सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्थापन करून उत्सव पुन: सुरू केला. ‘टिळक प्रस्थापित प्रथम गणपती ट्रस्ट’च्या माध्यमातून दरवर्षी गणशोत्सव साधेपणाने मात्र उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाऊ लागला. या गणेशाची विसर्जन मिरवणूक ही पालखीतूनच काढली जाते.

या प्रथम प्रस्थापित गणपतीपुढे स्वत: लोकमान्य एखादे तरी व्याख्यान देतच पण त्याबरोबरच मान्यवर व्याख्यात्यांनीदेखील या उत्सवात आपले विचार मांडले आहेत. विंचुरकर वाडय़ातील गणेशोत्सवाला अशी बौद्धिक परंपरा, इतिहास आहे. लोकमान्यांची अशी परंपरा लाभल्यामुळे हा गणेशोत्सव आज वेगळा ठरला आहे. इतर मोठमोठय़ा मंडळांप्रमाणे उत्सव येथे होत नाही, कसलाही झगमगाट इथे नसतो. किंबहुना येथील उत्सवामागे टिपिकल मंडळाची भूमिका नसून इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्याचा प्रयत्न अधिक आहे.

हे पण वाचा –

गणेश मंडळांसाठी खुशखबर! सवलतीच्या दरात मिळणार वीज

गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी खुशखबर

सार्वजनिक गणेशोत्सव कसा सुरु झाला…? जाणून घ्या

बाप्पाला नैवेद्य म्हणून ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा ‘उकडीचे मोदक’

लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव …

गणेशोत्सवाच्या धर्तीवर बाजारपेठा सजल्या ; साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची झुंबड

कोल्हापूरकरांचे ठरले, यंदाचा गणेशोत्सव साधेपणानेच

 

Leave a Comment