मोदींच्या मंत्री मंडळात मंत्री म्हणून शपथ घेणारे रावसाहेब दानवे नेमके आहेत कोण ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना प्रतिनिधी |”हॅलो रावसाहेब दानवे बोलतोय” असं म्हणताच समोरच्या अधिकाऱ्याला धडकीच भरते असे रावसाहेब दानवे यांचे व्यक्तिमत्व आहे. सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून गेलेले रावसाहेब दानवे भाजपचे सच्चे कार्यकर्ते आहेत. कारणकोणत्याच कोणत्याच उत्तर चढवावाला त्यांना भाजप सोडू वाटले नाही आणि भाजप सोडून इतर विचार देखील दानवेंनी केला नाही. म्हणून रावसाहेब दानवे भाजपला हावे हावेसे वाटतात.

मराठवाड्यातील भाजपचा मराठा चेहरा म्हणून ज्यांनी ओळख प्रस्तापित केली आहे ते म्हणजे रावसाहेब दानवे. यांनी आपल्या गावाच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. बी.ए चे शिक्षण घेत असताना रावसाहेब दानवे पंचायत समितीचे सदस्य झाले सभापती म्हणून देखील निवड करण्यात आली. त्यानंतर पुढील निवडणुकीत रावसाहेब दानवे जिल्हा परिषदेला निवडून गेले. त्यानंतर त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीत त्यांचा अल्प मतांनी पराभव झाला. पराभवाने खचून न जाता रावसाहेब दानवे यांनी पुढील विधान सभा लढवली आणि त्या विधानसभेत त्यांनी विजय मिळवला.

एका नंतर एक अशा राजकीय पायऱ्या चढत जाण्यास रावसाहेब दानवे यांना त्यांचे चुलते कुंडलिक दानवे यांची फार मदत झाली. मात्र राजकारणात कोणतेच नाते श्रेष्ठ नसते. कारण सत्ता हीच सर्व श्रेष्ठ जननी असते असा समज राजकीय व्यक्तींचा झालेला असतो. याच उक्तीला धरून रावसाहेब दानवे यांनी आपल्या गुरूचा म्हणजे चुलते कुंडलिक दानवे यांचा काटा काढला. कुंडलिक दानवे यांचे लोकसभेचे तिकीट कापून त्यांनी स्वतःच्या खिशात घातले आणि त्या दिवसा पासून आज तागायत ते २० वर्ष खासदार म्हणून दिल्लीत रुबाबात जालन्याचे प्रतिनिधित्व करत आहेत.

रावसाहेब दानवे यांना आज पुन्हा मंत्री पदाच्या जबाबदारीत गुंतवून त्यांचे प्रदेशाध्यक्ष पद खालसा केले आहे. कारण त्यांना अलीकडच्या काळात सारखीच मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांची राजकीय अपेक्षा चुकीची नसली तरी त्यांचे विखारी बोलणे भाजपचा जनाधार कमी करू लागले आहे. म्हणून त्यांना सुखद धक्का देऊन राज्याच्या राजकारणातून दूर लोटले आहे.

Leave a Comment