सातारा | गत दोन वर्षे कोरोनामुळे संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा झाला नाही. यामुळे भाविकांची निराशा झाली. परंतु, यंदा धडाक्यात वारीला सुरूवात झाली आहे. लोणंदमध्ये वारीचा अडीच दिवसांचा मुक्काम असल्याने लोणंदकरांना माऊलींच्या पालखीची आस लागून राहिली आहे. दोन वर्षे पालखीच्या दर्शनाला व्याकुळ असणाऱ्या भाविकांची इच्छा पुरी होणार असून यानिमित्त लोणंदमध्ये जनसागर लोटणार आहे.
जिल्ह्यात आगमन होताच पाडेगाव हद्दीत दत्तघाट येथे माऊलींच्या पादूकांना निरा स्नान होणार असून त्यानंतर माऊलींचे स्वागत समता आश्रम शाळेसमोर सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने मंडप उभारून सुशोभीकरण करण्यात आले आहे. यावेळी आगमन सोहळ्याला लोकप्रतिनिधी तसेच सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.
माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे दोन, तरडगाव एक, फलटण येथे दोन, बरड एक अशा सहा मुक्कामासाठी आगामन होणार आहे. कोरोनानंतर प्रथमच पालखी लोणंदमध्ये येणार असल्याने सर्वच विभागांनी व नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यात सहा दिवस विसावा आहे. या कालावधीत पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना जलद आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय मदत पथके व फिरत्य पथकांसह ५२ पथके कार्यरत आहेत. याचबरोबर साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून त्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाल आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंगळवारी दुपारी पुणे जिल्यातून सातारा जिल्यात प्रवेश करणार असून मंगळवारी लोणंद मुक्कामी विसावणार आहे . लोणद शहरामध्ये माऊलीच्या स्वागताच्या तयारीची कामे लोणद नगरपंचायत , पोलीस दल , आरोग्य विभाग बांधकाम विभाग , महसुल विभाग वीज वितरण कंपनी , जलसंपदा विभाग आदी विभागाच्या वतीने लोणंद शहरामध्ये . रस्ते , पाणी , वीज इंधन आदी गोष्टीची माऊलीच्या सोहळ्यात आलेल्या भाविकांना व वारकऱ्यांना कसलीही अडचन येणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे.