Longest Trains In India : भारतातील सर्वात लांब ट्रेन!! 295 डब्ब्यासह महाराष्ट्रातुन धावते

Longest Trains In India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Longest Trains In India । भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप आहे. देशात रेल्वेचे जाळे चांगलंच विकसित झालं असून देशाच्या कानाकोपऱ्यात ट्रेन पोहचली आहे. खास करून लांबच्या पल्ल्यासाठी आरामदायी आणि कमी खर्चात प्रवास होत असल्याने रेल्वेच्या प्रवासाला मोठी मागणी आहे. मागील काही वर्षात देशात वंदे भारत ट्रेन, वंदे भारत साधारण, नमो भारत ट्रेन, यांसारख्या वेगवेगळ्या रेल्वे रुळावरून धावत आहेत. परंतु तुम्हाला माहितेय का? भारतात अशी एक रेल्वे आहे जीला तब्बल 295 डब्बे आहेत. ट्रेनची लांबी 3.5 किमी इतकी असून देशातील हि सर्वात लांब अशी रेल्वे आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावते…. चला तर मग या रेल्वेबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात ..

काय आहे रेल्वेचं नाव – Longest Trains In India

आम्ही तुम्हाला ज्या रेल्वे बद्दल सांगत आहोत तिचे नाव आहे सुपर वासुकी ट्रेन….. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी ही रेल्वे लाँच करण्यात आली. या ट्रेनमध्ये एकूण २९५ डबे आहेत, जे मोजण्यासाठी जर कोणी बसले तर एक ते दीड तास लागू शकतात. ही ट्रेन सुमारे ३.५ किमी लांबीची आहे. म्हणजेच काय तर तुम्ही पहिल्या डब्या पासून शेवटच्या डब्बा पर्यंत जायचं म्हंटल तरी तुम्हाला ते अवघड पडेल. (Longest Trains In India) ही ट्रेन ओढण्यासाठी ६ इंजिन लागतात. भारतातील हि सर्वात लांब रेल्वे छत्तीसगड ते नागपूर मार्गावर धावते. छत्तीसगडमधील कोब्रा येथून ती निघते आणि नागपूरमधील राजनांदगावला पोहचते . या ट्रेनचा प्रवास पूर्ण होण्यास 11.20 तासांचा कालावधी लागतो.

परंतु ही काही प्रवाशी रेल्वे नाही, तर ती एक मालगाडी आहे, जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल वाहून नेण्यासाठी चालवली जाते. हि ट्रेन एका वेळी सुमारे २७००० टन माल वाहून नेते. ज्यामध्ये कोळसा वाहून नेला जातो, वीज निर्मितीसाठी पॉवर प्लांटमध्ये याचा वापर केला जातो. खरं तर भारतातील कोणत्याही ट्रेनमध्ये २४ ते २५ डबे असतात, तर विशेष ट्रेनमध्ये ३० ते ४० डबे देखील असू शकतात, परंतु सुपर वासुकी ट्रेन कुछ और हि है… म्हणूनच कि काय, आजही हि ट्रेन भारतातील सर्वात लांब (Longest Trains In India) आणि जास्त डब्बे असलेली ट्रेन म्हणून ओळखली जाते.