हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lord Buddha) लहानपणी एखादी चूक केली किंवा चुकीचे वागले असता मोठी मंडळी सांगायची की, आता देवबाप्पा तुझे कान कापणार. अर्थात देव आता तुला शिक्षा देणार. जर तुम्हाला सांगितले की, लहानपणी ऐकलेल्या या वाक्यानुसार खरोखर अशी एखादी घटना घडली आहे तर… तुम्ही अगदी बरोबर समजताय. थायलंडच्या चोनबुरी प्रांतातील बानबुंग जिल्ह्यात अशी एक घटना घडली आहे. जिथे देवाने खरोखर एका व्यक्तीला त्याच्या कुकर्माची शिक्षा दिली आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं काय घडलं?
भगवान बौद्धांनी दिली शिक्षा (Lord Buddha)
थायलंडच्या चोनबुरी प्रांतात बानबुंग जिल्ह्यात एक बौद्ध मंदिर आहे. या मंदिरात नियमित भाविकांची गर्दी असते. लोक या मंदिरात मोठ्या आस्थेने आणि श्रद्धेने येत असतात. मात्र एका मद्यधुंद व्यक्तीने या मंदिराच्या पावित्र्याचे नुकसान केले. ज्याची शिक्षा त्याला काही क्षणातच मिळाली. या व्यक्तीने बौद्ध मंदिराची तोडफोड केली आणि काही वेळातच त्या व्यक्तीचा विचित्र परिस्थितीत मृत्यू झाला. ही घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. लोक या घटनेला ‘कर्माचे फळ’ असे संबोधत आहेत.
जागीच झाला मृत्यू
एका ४९ वर्षीय थाई मद्यधुंद व्यक्तीने बौद्ध मंदिरात घुसून तोडफोड केली. (Lord Buddha) यावेळी काही भिक्खूंनी हस्तक्षेप केला असता त्याने भिक्खूंनाही जखमी केले. पुढच्या काही क्षणातच त्याला आपल्या कुकर्माची शिक्षा मिळाली. या व्यक्तीने मंदिराचे पावित्र्य भंगताना मुख्य सभामंडपाची तोडफोड केली. यावेळी तो भगवान बुध्दांच्या मूर्तीचा एक धारदार भाग त्याच्या डोक्यात आणि छातीत घुसला. एका क्षणात तो जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २७ फेब्रुवारीला घडली. या विचित्र मृत्यूची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
कुकर्माचे फळ
एका वृत्तानुसार, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, त्याच्याकडे शस्त्रे असू शकतात या चिंतेने त्यांना मंदिराबाहेर थांबावे लागले. मात्र काही क्षणात शांतता निर्माण झाली. (Lord Buddha) जिच्यामुळे पोलीस मंदिरात पोहोचले. यावेळी त्यांनी रक्ताने माखलेला मृतदेह पाहिला आणि त्यांना धक्का बसला. बुद्धाच्या मूर्तीमुळे त्यांच्या छातीत खोल खड्डा पडला होता.
तपासात असे समोर आले की, तो व्यक्ती सर्वात उंच बुद्ध मूर्तीवर चढून तिला भंग करण्याचा प्रयत्न करताना पुतळ्याचा धारदार भाग त्याच्या छातीत घुसला आणि त्याचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर या घटनेबाबत चर्चा सुरु असताना अनेकांनी कर्माचे फळ म्हणून या घटनेला संबोधले आहे. दरम्यान भगवान बुद्धांचा अनादर केल्यामुळे त्याला देवाने शिक्षा दिल्याचे देखील म्हटले जात आहे. (Lord Buddha)