हरवलेल्या पत्नीचा पतीला फोन..म्हणाली मला तुमच्या पेक्षा जास्त प्रेम करणारा मिळालाय; तुम्हीही तुमच्या साठी शोधा

पाटना | प्रिय, तुम्ही आता माझ्या लायक नाही राहिले. पाच वर्ष तुम्हाला ओझे समजून मी तुमच्याशी संसार केला. पण यापुढे तुमच्यासोबत जीवन जगणे शक्य नाही. मला तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करणारा नवरा मिळाला आहे. आपल्या मुलीसोबत मी तिथेच खुश राहीन. मला शोधू नका. तुमच्या टाईपची मुलगी शोधून लग्न करा. असे पत्नी तिच्या पतीला फोनवर म्हणाली.

याची तक्रार करण्यासाठी पती पटनाच्या पत्रकार नगर ठाण्यामध्ये गेला. आणि पोलिस अधिकाऱ्यांनी विचारल्यानंतर पती मोठ्या मोठ्याने रडून आपली करून कहाणी सांगत होता. याच क्षेत्रात तो भाड्याच्या घरात राहतो. तो दरभंगा क्षेत्रातील मूळचा रहिवाशी असून 2015 मध्ये त्याचे लग्न झाले होते. याच महिन्यातील तीन तारखेला पाच वर्षाची मुलीला सोबत घेऊन याची पत्नी बाजाराला गेली होती. आणि त्यानंतर ती बेपत्ता होती.

पत्नीची नातेवाईकांकडे चौकशी केली असता तिचा काही पत्ता मिळाला नाही.सहा फेब्रुवारीला अचानक फोन आला की ती परत येऊ शकत नाही आणि त्याच्याशी यापुढे ती संसार करू शकत नाही. त्यामुळे त्याने त्याच्या लायकीची मुलगी शोधून संसार करावा. पत्रकार नगर ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार नोंदवली गेली आहे असे ठाण्याचे पोलिस अधिकारी मनोरंजन भारती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

You might also like