हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज सभागृहात जोरदार बॅटिंग केली. देशातील शेतकरी, पेपर लीक, देशातील दहशतीचं सावट, बजेट आणि टॅक्सबाबत विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारला राहुल गांधींनी अक्षरशः धारेवर धरले. यावेळी राहुल गांधी यांनी महाभारतातील चक्रव्यूहचा उल्लेख करत मोदींवर निशाणा साधला. चक्रव्यूव्ह कमळाच्या आकाराचं होते, आणि पंतप्रधान मोदी आज ते चक्रव्यूव्ह छातीला लावून फिरतात असं म्हणत राहुल गांधींनी आणखी ६ लोकांची नावे घेतली आणि सभागृहात एकच गदारोळ पाहायला मिळाला.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
चक्रव्यूहमध्ये भीती, हिंसा असते, अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये फसवत 6 लोकांनी मारलं. चक्रव्यूहाचं दुसरं नावही आहे ते म्हणजे पद्मव्यूह म्हणजेच लोटस फॉरमेशन. यामधलं चक्रव्यूह हे कमळाच्या आकाराचं असतं. २१ व्या शतकात नवं चक्रव्यूह असून कमळाच्या आकाराचे आहे. त्याचं चित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या छातीवर लावून चालतात. ज्या चक्रव्यूहात अभिमन्यूला अडकवलं होतं. तिथे आता देशातील जनता आहे. देशातील युवा, शेतकरी, माता-भगिनी, लघु-मध्यम उद्योजक हे त्या चक्रव्यूहात अडकले आहेत. महाभारतातील चक्रव्यूहात ६ जण होते, द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, क्रूतवर्मा, अश्वधामा आणि शकुनी नियंत्रित करत होते. आजही ६ लोक आहेत ज्यात नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल आणि अंबानी-अदानी आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला.
राहुल गांधीही या व्यक्तींची नावे घेताच सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. यांनतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला.तसेच जी लोकं सभागृहाची सदस्य नाहीत त्यांची नावे घेऊ नका, असं ओम बिर्ला म्हणाले. त्यावर मी त्यांना A1, A2 बोलू शकतो का? असा उलट सवाल राहुल गांधींनी केला आणि सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गोंधळ उडाला