टीम हॅलो महाराष्ट्र । ‘लव्ह आज कल-२’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीझ झाला आहे. या चित्रपटात सारा अली खान आणि कार्तिक आर्यनची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच युट्यूबवर रिलीझ झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आहे. संवेदनशील रोमॅंटिक कथा पडद्यावर साकारणारा दिग्दर्शक म्हणून ओळख असलेल्या इम्तियाज अलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.
यापूर्वी २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल’ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. तेव्हा त्याच्या ‘लव्ह आज कल-२’ या सिक्वल चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. यापूर्वीच्या लव्ह आज कल चित्रपटात दीपिका आणि सैफची जोडी झळकली होती. तर या सिनेमाच्या सिक्वलमध्ये सैफची मुलगी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन याची हॉट केमेस्ट्री पडद्यावर दिसणार आहे. येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजे ‘वैलेंटाईन डे’ च्या दिवशी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पहा ट्रेलर-