बर्याचवेळा तुमच्या गर्लफ्रेंडला तुमचा एखादा मित्र आवडत असतो किंवा तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडची एखादी मैत्रीण आवडू लागते. पण असे होतंय म्हणुन तुम्हाला जास्त मनाला लावून घेण्याची गरज नाही. हे असं होणं अगदी स्वाभाविक आहे. एकत्र वेळ घालवल्याने समोरच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे अगदी साहजिक आहे. प्रेम आणि आकर्षण यात फरक असतो हे तुम्ही जाणुन घ्यायला हवे.
इतर महत्वाचे –
या गोष्टी करणार्या बाॅयफ्रेंडवर मुली भरभरुन प्रेम करतात
जॅकलिन बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हालाही धक्का बसेल
तुमचं हे असं होत असेल तर पहिल्यांदा तुम्ही हे शोधा की तुमच्या मनात तुमच्या बाॅयफ्रेंडच्या मित्राबद्दल नक्की काय विचार येत आहेत. किंवा तुमच्या गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीबद्दल तुमच्या मनात नक्की काय विचार येत आहेत. तुमचे फक्त क्रश आहे की आणखी काय आहे? बर्याचदा तुम्हाला एखाद्यावर खूप कमी वेळात क्रश होत असतो. परंतू या भावना दिर्घकाळ राहत नाहीत. कालांतराने पहिल्यापहिल्यांदा वाटणारे आकर्षण नंतर नाहिसे होते. तेव्हा तुम्हाला वाटत असणारे आकर्षण नक्की कोणत्या कॅटेगरीतले आहे याचा शोध घ्या. कमी कालावधीसाठी वाटणार्या आकर्षणासाठी कायमसाठी वाटणारे प्रेम गमावणार नाही याची खबरदारी घ्या.
इतर महत्वाचे –
इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल