PUBG वर जुळलेल्या प्रेमामुळे दोन प्रियकर अन् एका प्रेयसीमध्ये राडा; अशा प्रकारे झाला शेवट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

देहरादून : वृत्तसंस्था – तुम्ही अनेकदा फेसबुक, ईमेल आणि व्हाट्सअॅपवर मैत्री आणि प्रेम झाल्याचे ऐकले असेल. अशीच एक घटना उत्तराखंडमधील हल्द्वानी भागामध्ये घडली आहे. यामध्ये राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून प्रेयसीला भेटायला आलेल्या दोन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. ती तरुणी या दोघांबरोबर प्रेमाचा खेळ खेळत होती. तब्बल दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन गेम खेळत असताना या तरुणीची राजस्थानमधील तरुणासोबत मैत्री झाली होती. त्यानंतर दोघेही एकत्रच पबजी गेम खेळत होते. यानंतर त्यांची मैत्री अधिक फुलल्यानंतर त्यांनी एकमेकांना आपला फोन नंबर सेंड केला आणि ते एकमेकांबरोबर फोनवर बोलू लागले. यादरम्यान दोघेही प्रेमात पडले, आणि त्यांनी भेटण्याचा प्लान केला.

तसेच एक महिन्यापूर्वी ऑनलाइन खेळादरम्यान याच तरुणीची मैत्री मुरादाबाद येथील एका तरुणासोबत झाली. ती तरुणी या तरुणाच्यासुद्धा प्रेमात पडली. यानंतर या तरुणीने मुरादाबादमधील तरुणाला भेटण्यासाठी हल्द्वानी या ठिकाणी भेटायला बोलावले. शुक्रवारी दोघांना भेटायला तरुणी मल्ला गोरखपूर हल्द्वानी या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी पोहोचताच हे दोघे तरुण तरुणीला आपली प्रेयसी असल्याचे सांगून एकमेकांसोबत भांडू लागले. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी केली असता हे सगळं प्रकरण समोर आले.

तरुणीने लगावली कानशिलात
तरुणीने दोन्ही तरुणांना एकत्र का बोलावलं, हे मात्र अजून समजू शकलेले नाही. ज्यावेळी दोन्ही तरुण भांडण करीत होते, त्यावेळी तरुणीही तेथे होती. यावेळी तिने राजस्थानमधील तरुणाला कानशिलात लगावली होती. हे दोन्ही तरुण पबजी गेम खेळण्यात प्रोफेशनल लेव्हलचे खेळाडू आहेत.

Leave a Comment