LPG Cylinder Price Hiked : आज १ मार्च असून महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशातील सर्वसामान्य जनतेला मोठा झटका बसला आहे. कारण रोजच्या आयुष्यात जीवनावश्यक असलेल्या गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सिलेंडरच्या दरात 25.50 रुपयांनी वाढ करण्यात आली. मात्र हि दरवाढ घरगुरी सिलेंडरसाठी नव्हे तर व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत करण्यात आली आहे. सरकारी तेल आणि वायू कंपन्यांकडून आजपासूनच ही दरवाढ करण्यात आली आहे.
सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. मागील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये सुद्धा व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या, मात्र त्यावेळी फक्त १. ५० रुपयांची मामुली दरवाढ करण्यात आली होती. मात्र आता तब्बल 25.50 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. खरं तर होळीचा सण हा 24 आणि 25 मार्च रोजी देशभरात साजरा होणार आहे. त्यापूर्वीच सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी ही दरवाढ (LPG Cylinder Price Hiked) जाहीर केल्याने जनतेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
कशा असतील गॅसच्या नव्या किमती – LPG Cylinder Price Hiked
दरम्यान, या वाढीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1,795.00 रुपये झाली आहे. यापूर्वी ती 1,769.50 रुपयांना उपलब्ध होते. तर मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत आधी 1723.50 रुपये होती ती आता 1749 रुपयांवर गेली आहे. तर कोलकाता मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 1887 रुपयांवरून 1911 रुपयांवर गेलेला आहे. या दरवाढीमुळे आता उन्हाळ्यात हॉटेलच चमचमीत जेवण खाणे चांगलेच महाग होण्याची शक्यता आहे.