हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन LPG Gas Cylinder Price । सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांना मोठी गुडन्यूज आहे. गॅस सिलेंडरच्या किमती तब्बल ५१.५० रुपयांनी कमी झाल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना जणू बाप्पाचा पावला असं म्हणावं लागेल. परंतु या किमती घरगुती गॅस सिलेंडर साठी नव्हे तर व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी कमी झाल्या आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती आहे तशाच कायम आहेत, त्यात कोणताही बदल झालेला नाही.
कोणत्या शहरात किती रुपये दर? LPG Gas Cylinder Price
तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केल्यानंतर नव्या दरानुसार, दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १६३१.५० रुपयांवरून १५८० रुपयांवर आली आहे. कोलकातामध्ये यापूर्वी १७३४.५० रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर आता १६८४ रुपयांत मिळेल. मुंबईत सुद्धा व्यावसायिक गॅस सिलेंडर १५८२.५० रुपयांवरून १५३१.५० रुपयांवर आला आहे. तर दक्षिण भारतातील चेन्नई मध्ये १७८९ रुपयांचा गॅस सिलेंडर आता १७३८ रुपयांना मिळणार आहे. यामुळे हॉटेल चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे हॉटेल, बार, लॉज, ढाबा, रेस्टॉरंट अशा ठिकाणी जेवणाचे रेट कमी होतील.
तस बघितलं तर मागील काही महिन्यापासून १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती (LPG Gas Cylinder Price) सातत्याने कमी होताना दिसत आहेत. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात तेल विपणन कंपन्यांनी देशभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ३३.५० रुपयांची कपात केली होती. जुलै महिन्यात सुद्धा व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती ५८ रुपयांनी स्वस्त झाली होती. आता सप्टेंबर महिन्यात ५१.५० रुपयांनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती, भारतीय चलन रुपयाची स्थिती आणि इतर बाजार परिस्थितीवर गॅस सिलेंडरच्या किमती अवलंबून असतात.




