हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून नवीन वर्ष 2023 सुरु होत असून पहिल्याच दिवशी जनतेला महागाईचा झटका बसला आहे. आजपासून व्यावसायिक (LPG Gas Cylinder Price Hike) गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
नव्या दरवाढीनुसार, (LPG Gas Cylinder Price Hike) आजपासून दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1769 रुपये झाली आहे. तर मुंबईत 1721 रुपये, चेन्नई मध्ये 1917 रुपये आणि कोलकाता मध्ये 1869.5 रुपये किमतीला व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळेल. या नव्या दरवाढी मुळे हॉटेल मधील जेवण आणखी महाग होण्याची शक्यता आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही- (LPG Gas Cylinder Price Hike)
एकीकडे कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असताना दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (LPG Gas Cylinder Price Hike) त्यामुळे काही प्रमाणात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत 1053 रुपये आहे. याशिवाय, मुंबईत 1052.5 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये, तर चेन्नईमध्ये 1068.5 रुपयांना उपलब्ध आहे. गेल्या 9 महिन्यांत घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 153.5 रुपयांनी वाढ झाली आहे.