सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी!! LPG गॅस सिलेंडरच्या नोव्हेंबरच्या किंमती जाहीर ; असे आहेत नवे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वाढत्या महागाईत नोव्हेंबरमधील गॅस सिलेंडरच्या किंमतींनी सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) नोव्हेंबर महिन्यातील किंमती न बदलण्याचा निर्णय सरकारी तेल कंपन्यांनी घेतला आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यातही HPCL, BPCL, IOC यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल केला नव्हता.

देशातील सर्वात मोठी तेल विपणन कंपनी IOC च्या वेबसाइटवर दिलेल्या किंमतीनुसार दिल्लीतील सिलेंडरचे दर स्थिर राहिले आहेत. गेल्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये किंमती होत्या त्याच किंमती असणार आहे. मुंबईत सब्सिडी नसलेल्या सिलेंडरची किंमत 594 रुपये असणार आहे.

कमर्शियल गॅसच्या किमतीमध्ये वाढ

नोव्हेंबर महिन्यासाठी 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत वाढली आहे. चेन्नईने जास्तीत जास्त 78 रुपये सिलेंडरची वाढ केली आहे. आता येथे व्यावसायिक सिलेंडरसाठी 1,354 रुपये द्यावे लागतील. कोलकाता आणि मुंबईत प्रति सिलेंडरमध्ये 76 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर या दोन शहरांमधील नवीन दर अनुक्रमे 1,296 आणि 1,189 रुपये आहेत. राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाल्यास, आता तुम्हाला व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1,241 रुपये द्यावे लागतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment