LPG Gas Cylinder Price : LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खुशखबर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लोकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (Indian Oil Corporation Limited) व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे नवीन वर्ष लोकांसाठी गिफ्ट मानले जाऊ लागले आहे. यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, आणि ढाबा मालकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. या किंमती कमी करण्याच्या निर्णयामुळे लोकांना सिलेंडर घेताना कमी पैसे मोजावे लागणार आहेत. याचाच परिणाम म्हणजे आर्थिक बचत होण्यास मदत होईल. तर चला या किमती किती कमी झाल्या आहेत हे पाहुयात.

एलपीजी सिलेंडरच्या किंमती –

दिल्लीमध्ये आता 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी (liquefied petroleum gas) सिलेंडर 1804 रुपयांना उपलब्ध असून, त्याच्या किंमतीत 16 रुपयांची घट झाली आहे. मुंबईतही सिलेंडर 1756 रुपयांना मिळत असून, याआधी तो 1771 रुपयांना मिळत होता. ही सवलत फक्त व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरवर लागू असून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

निर्णयामुळे मोठा आधार –

किंमती कमी झाल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खाण्याच्या बिलांवर भार कमी होण्याची शक्यता आहे. तसेच ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवांवरही याचा परिणाम दिसून येईल. गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG cylinder) किंमती वाढत होत्या, त्यामुळे व्यवसायिकांवर मोठा आर्थिक दबाव निर्माण झाला होता. पण या निर्णयामुळे त्यांना मोठा आधार मिळाला आहे. घरगुती वापरासाठीच्या 14 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमती अजून स्थिर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना घरगुती गॅसच्या दरात सवलत मिळालेली नाही.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच नागरिकांना गिफ्ट –

सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सुधारणा करतात. डिसेंबरमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच घट करून सामान्यांना थोडासा दिलासा देण्यात आला आहे. या किमती कमी झाल्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात चांगले परिमाण होताना दिसणार आहेत .