LPG Price : सरकारी तेल कंपन्यांकडून गॅस सिलेंडरच्या दरात बदल ??? नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG Price : आजपासून डिसेंबर महिना सुरु होतो आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेऊन त्यामध्ये बदल केले जातात. आजही त्यामध्ये तेल कंपन्यांकडून बदल करण्यात येणार होते, मात्र सध्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला गेलेला नाही.

LPG Price 1st Dec Today: Government oil companies have released the new rates of LPG cylinders today, see the LPG new prices of your cities immediately - Rightsofemployees.com

हे लक्षात घ्या कि, गेल्या चार महिन्यांपासून सरकारी तेल कंपन्यांकडून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात सातत्याने कपात केली जात होती, मात्र डिसेंबरमध्ये त्याची किंमत स्थिर ठेवण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलेंडरच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसून येत आहेत. सध्या देशभरात व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत नोव्हेंबरच्या दरानुसारच स्थिर आहेत. LPG Price

इतर शहरातील सिलिंडरचे दर पहा

यावेळी सरकारी तेल कंपन्यांनी देशातील सर्व महानगरांमधील सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. ज्यानुसार आता 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत कोलकात्यातामध्ये 1,079 रुपये, मुंबईत 1,052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,068.50 रुपये आहे. LPG Price

Lpg Price Hike: 14.2 Kg Domestic Lpg Cylinder Price Hiked By Rs 3.5; Crosses Rs 1,000-Mark

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती देखील स्थिर

सरकारी तेल कंपन्यांकडून यावेळी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतींतही कोणताही बदल केला गेलेला नाही. त्याचे दर देखील नोव्हेंबरमधील दरा इतकेच आहेत. ज्यानुसार दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत सध्या 1,744 रुपये आहे तर कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 1,846 रुपये दराने उपलब्ध आहे. मुंबईत त्याची किंमत 1,696 रुपये आहे तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1,893 रुपये आहे. LPG Price

Domestic LPG cylinders gets costlier by Rs 50 - BusinessToday

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत या वर्षात 5 वेळा बदल

हे लक्षात घ्या कि, 2022 या आर्थिक वर्षांमध्ये मध्ये सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींत 5 वेळा बदल केला आहे. तसेच दुसरीकडे, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतींत यावर्षी 11 वेळा कपात करण्यात आली आहे. 6 जुलै 2022 पासून कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. हे लक्षात घ्या कि, केंद्र सरकारकडून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली जाते, ज्यामुळे त्यांना ते परवडणारे आहे. LPG Price

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/lpg-price.html

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा