LTTE प्रमुख प्रभाकरन जिवंत, लवकरच तो सर्वांसमोर येईल; कोणी केला दावा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमचा प्रमुख (LTTE) वेलुपिल्लई प्रभाकरन अजूनही जिवंत आहे असा धक्कादायक दावा वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ तामिळचे अध्यक्ष पी नेदुमारन यांनी केला आहे. योग्य वेळ येताच प्रभाकरन जगासमोर येईल असेही नेदुमारन यांनी म्हटले आहे.

प्रभाकरन जिवंत आहे, ठीक आहे. असं नेदुमारन यांनी म्हंटल. तसेच प्रभाकरन यांचे कुटुंबही आपल्या सतत संपर्कात असून ते सुद्धा सुरक्षित असल्याचा दावाही नेदुमारन यांनी केला. प्रभारकनने संमती दिल्यांनतर मी ही माहिती सांगत आहे. लवकरच तो सर्वांसमोर येईल. त्यावेळी तामिळनाडूमधील सरकार, राजकीय पक्ष आणि जनतेने प्रभाकरनच्या पाठीशी उभे राहावं असं आवाहन नेदुमारन यांनी केले.

वेलुपिल्लई प्रभाकरन हा लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. LTTE ने श्रीलंकेच्या उत्तरेला आणि पूर्वेला एक स्वतंत्र तमिळ राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेत तामिळ लोकांसाठी स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी LTTE ने 25 वर्षांहून अधिक काळ श्रीलंकेत युद्ध पुकारले. जवळपास तीन दशके लोकांना त्यांच्या दहशतीने घाबरवले. त्यानंतर 2009 मध्ये श्रीलंका सरकार आणि लष्कराने एलटीटीई प्रमुख प्रभाकरनची हत्या केली. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप प्रभाकरनवर आहे