Lung Cancer | प्रदुषणामुळे वाढतोय फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका; सुरुवातीला दिसतात ‘ही’ लक्षणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lung Cancer | आज काल दिल्लीसह संपूर्ण देशामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हवेच्या गुणवत्तेत बदल होताना दिसत आहे. अत्यंत खराब श्रेणीमध्ये हवेची गुणवत्ता येत आहे. त्यामुळे मानवाच्या आरोग्याला देखील मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. प्रदूषणामुळे अनेक लोकांना आजार होत आहेत.

याबाबत दिल्लीच्या डॉक्टर प्रज्ञा शुक्ला म्हणाल्या की, “दिल्ली एनसीआरमध्ये फुफुसाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि याचे मुख्य कारण म्हणजे हवेचे प्रदूषण होत आहे. फुफुसाचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. त्याची लक्षणे गंभीर अवस्थेत पोहोचल्यानंतर दिसतात. त्यामुळे जर तुम्हाला सुरुवातीच्या काळातच काही लक्षणे दिसली तर डॉक्टर चे उपचार सुरू करा.

फुफ्फुसाचा कर्करोगाची लक्षणे | Lung Cancer

सतत खोकला येणे

तुम्हाला जर आठवडाभरापेक्षाही जास्त काळ खोकला राहत असेल, तसेच खोकलातून रक्त येत असेल. तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण हे एक फुफुसाच्या कर्करोगाचे गंभीर लक्षण आहे.

श्वास घेताना त्रास

ज्यावेळी फुफुसाचा कर्करोग होतो. त्यावेळी रुग्णांना श्वास घेण्यामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होते. अशावेळी छाती, खांदे, पाठ आणि इतर भागात वेदना होतात. हा कर्करोग जर हाडापर्यंत पसरला, तर संपूर्ण शरीरात वेदना होतात.

अचानक वजन घटणे | Lung Cancer

ज्यावेळी फुफुसाचा कर्करोग होतो. त्यावेळी व्यक्तीचे वजन अचानक कमी होते. आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होते. कर्करोग पेशी शरीरातील सर्व ऊर्जा वापरून घेतात. आणि तुमचे वजन झपाट्याने कमी होते.

यापासून कसे वाचाल?

तुम्हाला जर फुफुसाच्या कर्करोगापासून वाचायचे असेल, तर तुम्ही धूम्रपान सोडून द्या. तसेच धुर आणि धूळ असलेल्या ठिकाणी जाणे टाळा. त्याचप्रमाणे प्रदूषित शहरात जाताना मास्क वापरा. घरात एयर प्युरिफायर लावा. स्वच्छ हवेसाठी घराच्या आजूबाजूला झाडे लावा. आणि स्वच्छ ऑक्सिजन घ्या.