Lung Cancer Symptoms | ‘ही’ आहेत फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे; हाताच्या बोटांवरून होईल निदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lung Cancer Symptoms | आजकाल कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. लोकांची जीवनशैली बदलल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहे. आणि यामुळेच अनेक लोकांना त्यांचा जीव देखील गमावायला लागलेलआहेत. परंतु आजकाल कॅन्सर होणे ही अत्यंत सामान्य गोष्ट झालेली आहे. त्यातही फुफुसाचा कर्करोग (Lung Cancer Symptoms) आजकाल आणि लोकांना होत असतो. तुम्हाला जर कॅन्सर झाल्याचे निदान उशिरा झाले आणि त्यावर उपचार वेळेवर झाले नाही, तर अनेक लोकांचा मृत्यू होतो. परंतु तुम्हाला कॅन्सरचा धोका आहे की नाही?हे तुम्ही डायमंड फिंगर टेस्ट करून जाणून घेऊ शकता. ही चाचणी तुम्ही अगदी घरी देखील करू शकता.

काय आहे डायमंड फिंगर चाचणी ? | Lung Cancer Symptoms

ही चाचणी करण्यासाठी तुम्ही तुमचा अंगठा आणि तर्जनी यांना एकत्र आणा. त्यामध्ये जागा शिल्लक राहत नसेल. तर ते बोटांच्या प्लंबिंगचे लक्षण आहे. तसेच ही फुफ्फुसाच्या कर्करोगाचे देखील लक्षण असते. अशी स्थिती लहान पेशी नसलेल्या कर्करोग असलेल्या 35% पेक्षा जास्त लोकांमध्ये दिसून येत आहे. या लोकांमध्ये प्लंबिंग , फुफ्फुस, हृदयआणि पचन संस्थेतील समस्या निर्माण होते.

फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे

फुफुसाचा कर्करोग झाला तर यामध्ये लोकांना तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला राहतो. तो पूर्णपणे बरा होत नाही. तसेच छातीत जंतू संसर्ग तयार होतात, खोकल्यातून रक्त येणे, श्वास लागणे, भूक न लागले यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. तसेच व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि मानेवर सूज येते. त्यांना गिळण्याचा देखील त्रास होत.

काय आहे कारण ? | Lung Cancer Symptoms

फुफुसाच्या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे धूम्रपान करणे. तसेच जर कौटुंबिक इतिहास असेल एचआयव्ही हे देखील या आजारासाठी धोक्याचे घटक आहेत. सध्या आपल्या वातावरणात प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. याचा देखील परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यात अनेक लोक धूम्रपान आणि मद्यपान करतात. त्यामुळे फुफुसाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.