नरेंद्र मोदींनी घेतले एम.करूननिधीचे अंत्यदर्शन

m karunanidhi and narendra modi
m karunanidhi and narendra modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी आज सकाळी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या अंत्ययात्रेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी करुणानिधी यांचा मुलगा स्टॉलीन आणि सर्व परिवाराशी आपुलकीने संवाद साधला.

द्रमुकचे सर्वेसर्वा एम.करुणानिधी यांचे काल निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नरेंद्र मोदी सकाळी साडे दहाच्या सुमारास चेन्नई विमानतळावर उतरले. त्यांनी सव्वा अकराच्या सुमाराला राजाजी हॉल मध्ये जाऊन करुणानिधी यांनी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आहे. एम करुणानिधी यांचे शव चेन्नई येथील राजाजी सभागृहात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
एम.

करुणानिधी हे दक्षिणीतील जेष्ठ नेते होते त्यांनी तामिळनाडूचे पाच वेळा मुख्यमंत्री पद भूषवले आहे तर तेरा वेळा विधानसभेवर निवडून जाण्याचा विक्रम केला आहे. करुणानिधी यांच्या जाण्याने तामिळनाडू च्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.