माण तालुका कृषी बाजार समितीत आ. जयकुमार गोरे, रासपची सत्ता तर राष्ट्रवादी काॅंग्रेसला 7 जागा ः शेखर गोरेंवर नामुष्की एकही जागा नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दहिवडी | सातारा जिल्ह्यातील माण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 17 जागांपैकी भाजपच्या आ. जयकुमार गोरे यांना 6, रासपचे बबन दादा वीरकर यांना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर देशमुख यांना 7 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत मात्र शिवसेनेचे शेखर गोरे यांना एक ही जागा मिळवता आलेली नाही. निकाल लागल्यानंतर पुन्हा फेर मतमोजणी घेण्यात आली. मात्र निकालात कोणताही बदल न झाल्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपा कार्यालयावर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. तर भाजपा व रासपाने एकत्रित येवून 10 जागा मिळवत सत्ता कायम राखली आहे.

आज पार पडलेल्या निवडणुकीत 17 जागेसाठी दोन अपक्षांसह 53 उमेदवार रिंगणात होते. यासाठी 2 हजार 64 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत 97.53% टक्के मतदान झाले असून याची आज मतमोजणी पार पडली. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळाली. मागील एक महिन्यापासून माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची रणधुमाळी, आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी संपून शनिवारी (दि. 7) मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज रविवारी 8 ऑगस्टला निकाल जाहीर झाला. माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व रासप युतीने 17 पैकी 10 जागा मिळवून सत्ता कायम राखली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व आघाडीला 7 जागा मिळाल्या.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ः सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघातून विजयी उमेदवार, त्यांची मते व पक्ष

1) जगदाळे सूर्याजी विश्वासराव, 306 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, 2) बनगर अर्जुन आगतराव, 306 भाजप व रासप, 3) देशमुख विलास आबा, 301 भाजप व रासप, 4) सस्ते दत्तात्रय पांडुरंग, 287 भाजप व रासप, 5) यादव रमेश दगडू, 285 भाजप व रासप, 6) कदम रामचंद्र गणपती, 284 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडरा रराखीव, 7) भोसले कुंडलिक दादासो, 283 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी

सोसायटी मतदारसंघ महिला राखीव

1) जाधव निर्मला नंदकुमार, 314 भाजप व रासप 2) वीरकर वैशाली बाबासो, 302 भाजप व रासप

सोसायटी मतदारसंघ इतर मागास प्रवर्ग

1) राऊत अमोल साहेबराव, 308 भाजप व रासप

सोसायटी मतदारसंघ विमुक्त जाती-जमाती

1) झिमल रामचंद्र श्रीरंग, 306 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी

ग्रामपंचायत मतदारसंघातून विजयी उमेदवार

1) काळे बाळकृष्ण किसन, 420 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, 2) योगेश महादेव भोसले, 366 राष्ट्रवादी काँग्रेस विकास आघाडी

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती

1) तुपे रविंद्र पोपट, 371 भाजप व रासप

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल

1) पुकळे ब्रह्मदेव तुकाराम, 385 भाजप व रासप

व्यापारी मतदारसंघ विजयी उमेदवार

1) किसन चंद्रोजी सावंत, 195 राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, 2) शेखर मोतीलाल गांधी, 153 भाजप

सोसायटी मतदारसंघात एका उमेदवाराला 283 तर दुसऱ्या उमेदवाराला 281 मते मिळाली. त्यामुळे फेरमत मोजणीची मागणी करण्यात आली. मात्र निकालात कोणताच बदल न झाल्याने भोसले कुंडलिक दादासो हे राष्ट्रवादीच्या उमेदवाराने विजय मिळविला.

Leave a Comment