मटण खाऊ घालत नाही म्हणून वृध्द वडिलांचा कुऱ्हाडीने खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दहिवडी | माण तालुक्यातील कासारवाडी येथे स्वतः च्या मुलाने वृध्द पित्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. मला मटण का खाऊ घालत नाही या कारणावरून चिडून जावून मुलाने खून केला. या घटनेने माण तालुक्यात खळबळ माजली आहे. पांडुरंग बाबुराव सस्ते (वय- 70 ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर नटराज सस्ते असे खून करणाऱ्या मुलाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद चतुराबाई पांडुरंग सस्ते (वय-60) यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी, कासारवाडी (ता.माण ) येथील आरोपी मुलगा नटराज पांडुरंग सस्ते याने आपले वृध्द वडील पांडुरंग बाबुराव सस्ते यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी कुऱ्हाडीने वार केले. कासारवाडी येथील स्वतःच्या मालकीच्या भंडारदरा मळवी या शिवारात पाठीमागून डोक्यावर व मानगुटीवर मुलगा नटराज यांने वडील पांडुरंग सस्ते यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घालून गंभीर जखमी केले. त्यानंतर ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात मृत होऊन पडले.

या घटनेची माहिती गावात पसरताच सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दहिवडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. डी. तुपे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नटराज सस्ते यास पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Comment