सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या लोणंद नगरपंचायतची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुमती पलंगे (गालिंदे ) यांची दहा विरूद्ध सात मताने निवड झाली. तर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे शिवाजीराव शेळके-पाटील यांचीही दहा विरूद्ध सात मताने निवड करण्यात आली.
आज लोणंद नगरपंचायतच्या सभागृहात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विषेश सभेला सुरुवात झाली. यावेळी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप आणि प्रभारी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवार मधुमती पलंगे यांनी दहा मते मिळवत बाजी मारली तर विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार दिपाली निलेश शेळके यांना सात मते पडली. तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव शेळके यांनी भाजपच्या उमेदवार दिपाली संदिप शेळके यांचा दहा विरूद्ध सात अशा मतांनी पराभव केला.
या निवडीवेळी नगरपंचायतीच्या सभागृहात भरत शेळके,रविद्र क्षीरसागर, सचिन शेळके, गणीभाई कच्छी, भरत बोडरे, सुप्रिया शेळके, सीमा खरात, राशिदा इनामदार, प्रविण व्हावळ, आसिया बागवान, तृप्ती घाडगे, राजश्री शेळके, ज्योती डोनीकर आदी नगरसेवक उपस्थित होते.