‘या’ राज्यात खुलणार केवळ महिलांसाठी दारूचे अड्डे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बऱ्याचदा महिला दारूच्या दुकानात दारू विकत घेण्यासाठी लाजतात. असं होणं साहजिक आहे, कारण एखादी महिला दारू खरेदी करायला गेल्यास तिच्या आजूबाजूचे लोक, तसेच दुकानदारसुद्धा तिला अशा नजरेनं पाहतात की ज्यामुळं तिच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. मात्र, मध्य प्रदेश सरकारने दुकानातून दारू खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या महिलांसाठी एक नवा मार्ग शोधला आहे. होय, मध्यप्रदेश सरकार राज्यातील काही शहरांमध्ये खास महिलांसाठी दारूची दुकाने उघडणार आहे, जिथे त्या आरामात दारू खरेदी करू शकतील.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मध्यप्रदेश सरकार भोपाळ आणि इंदूर येथे महिलांना समर्पित अशी दोन वाईन स्टोअर उघडणार आहे, तर ग्वाल्हेर आणि जबलपूरमध्ये प्रत्येकी एक वाईन स्टोअर उघडणार आहे. इतकेच नाही तर महिलांना पसंत असलेल्या महागड्या विदेशी ब्रँडच्या मद्याला जागा देण्यासाठी या स्टोअरमध्ये विशेष काळजी घेतली जाईल. ज्या दारूच्या ब्रँडची नोंदणी राज्यात झाली नाही त्यांना या दुकानांमध्ये जागा दिली जाणार नाही.
एका सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “या परदेशी ब्रॅण्डच्या दारूवर कोणताही अतिरिक्त कर आकारला जाणार नाही कारण ते ड्युटी दिल्यानंतरच परदेशातून खरेदी केले जातील. अशी दुकाने राज्यातील महागड्या मद्याची बाजारपेठ उघडण्याचेही काम करतील.”

मिळालेल्या माहितीनुसार, या दुकानांमध्ये परदेशी ब्रँडची मद्य विक्री होईल, जी यापूर्वी राज्यात कधीच विकली गेली नव्हती. महसुलासाठी राज्य सरकार इंदूर, भोपाळ आणि ग्वाल्हेरमध्ये वाइन फेस्टिव्हलचे आयोजन करणार आहे.दरम्यान, १ एप्रिलपासून मध्य प्रदेशात दारूच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. राज्य सरकार यावर्षी अबकारी कराद्वारे २०० कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याच्या योजनेवर काम करीत आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment