ऐकावे ते नवलंच!! शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर पाहिजे ; मध्यप्रदेशातील महिलेचे राष्ट्रपतींना पत्र

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील मंदसौर येथे एक आश्चर्यकारक मामला समोर आला आहे. एका महिलेने चक्क राष्ट्रपतींना पत्र लिहून एक विचित्र विनंती केली आहे. ही चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या महिलेचे नाव बसंती बाई लोहार असे आहे. आणि ही अगर गावची रहिवासी आहे. बसंती बाईने राष्ट्रपती कोविंद यांना, स्वतच्या शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर विकत घेण्याकरिता कर्ज आणि ते चालवण्याचे लायसन्ससाठी मदत याचना करणारे पत्र लिहिले आहे.

न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार बसंती बाई या राष्ट्रपतींना पत्र लिहिण्यासाठी मजबूर व्हावे लागले. कारण त्यांच्या शेतीचा रस्ता त्यांच्या शेजार्‍यांनी बंद केला आहे त्यामुळे शेतात जाण्याचे सर्व रस्ते बंद झाले असून, जनावरांना खायला चारा आणि शेती करण्यासाठी जाऊ शकत नाही. बसंतीयांनी यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा पत्रे दिली होते. परंतु तरीही या समस्येचे निराकरण होऊ शकले नाही. यानंतर राष्ट्रपतींना पत्र लिहून या महिलेने मदत करण्यासाठी विनंती केली आहे.

बसंती बाईचे पत्र व्हायरल झाल्यानंतर महसूल प्रशासनाने स्थानिक नायब तहसिलदार यांना तक्रारी बाबत माहिती घेण्यासाठी पाठवले. यानंतर नायब तहसीलदार यांनी महिलेच्या शेतावर जाऊन पडताळणी केली. यावेळी महिलेला अधिकाऱ्यांना ठोस पुरावा त्याठिकाणी मिळाला नाही. तहसीलदार यांनी पत्रकारांना माहिती दिली त्यानुसार, ते पत्र स्थानिक मुद्दे समोर आणण्यासाठी लिहिले गेले असून, महिलेचा रस्ता ब्लॉक केल्या जाण्यासारख्या कोणत्याही घटना समोर आलेल्या नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like