हर हर महादेवचा गजर : शिंगणापूरच्या मुंगी घाटात लाखो शिवभक्तांची मादियाळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

शिवभक्तांच्या ‘हर हर महादेव’च्या सोबत ‘म्हाद्या धाव’ चा गजर करत अवघा मुंगी घाट दुमदुमून गेला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्ष यात्रा भाविकांच्या अनुपस्थित पार पडली. मात्र, शंभू महादेवाच्या चरणी विक्रमी गर्दीने शिंगणापूर (ता. माण) परिसर गजबजून गेला. शिवभक्तांसह हजारो वाहनांच्या गर्दीने सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली.

चैत्र पंचमीपासून शिव-पार्वती हळदी, विवाह व धज बांधण्याचा सोहळा पार पडला. नवमीच्या दिवशी भातांगळी (जि. लातूर) येथील मानाच्या काठीने शंभू महादेवाचे दर्शन घेतले. एकादशीदिवशी शेवगाव (जि. नगर) येथील इंदौर घराण्यातील काळगावडे राणे यांनी घोड्यावरून येऊन शंभू महादेवाचे दर्शन घेतले. देवाच्या लग्नाची वरात म्हणून द्वादशीच्या दिवशी आज मुंगी घाटातील लक्षवेधी व चित्तथरारक कावडी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी ११ वाजल्यापासून हजारो कावडी सकाळपासूनच पुष्कर तलावातील जलतीर्थ घेऊन वाजत-गाजत पायरी मार्गाने मंदिराकडे जात होत्या. सर्व मानाच्या कावडींचे कोथळे (ता. माळशिरस) या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रशासनाने स्वागत केले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/280915077580657

 

इंदापूर, माळशिरस, बारामती तालुक्यांतील कावडी मुंगी घाटातून चढल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास सासवड पंचक्रोशीतील मानाच्या कावडी चढण्यास प्रारंभ झाला. दुपारी दोनपासून मुंगी घाटातून कावडी चढण्यास प्रारंभ झाला. सायंकाळी साडेपाचच्यादरम्यान श्री संत भुतोजी बुवा-सासवडकर यांच्या कावडीने मुंगी घाट चढण्यास प्रारंभ केला. साडेसहा वाजता मुंगी घाट चढून आल्यावर ‘हर हर महादेव’ ‘शिव-पार्वती हर हर की जय’ महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज अशा घोषणांनी संपूर्ण मुंगी घाट परिसर दुमदुमून गेला.

Leave a Comment