Maha Shivaratri 2025 | हिंदू शास्त्रामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता म्हणूनच हा दिवस शुभ मानला जातो. तसेच, शिवभक्त हा दिवस मोठ्या उत्साहात साजरी करतात. असे मानले जाते की, महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास, पूजा आणि जप-तप केल्याने विशेष फळ मिळते तसेच, काही शुभ वस्तू घरी आणल्यास शंकराचा कृपाशीर्वाद लाभतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्या वस्तू कोणत्या आहेत आपण जाणून घेऊया.
महाशिवरात्री कधी आहे?
वैदिक पंचांगानुसार, यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:08 वाजता सुरू होईल आणि 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 08:54 वाजता समाप्त होईल. या दिवशी निशिता काल पूजेचे विशेष महत्त्व आहे. ही पूजा केल्यास घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते, असे म्हटले जाते.
महाशिवरात्रीच्या दिवशी या वस्तू घ्या (Maha Shivaratri 2025)
- भगवान शंकराचा फोटो किंवा मूर्ती
महाशिवरात्रीच्या दिवशी घरात भगवान शंकराचा पारिवारासह फोटो आणणे अत्यंत शुभ मानले जाते. शंकर, पार्वती, गणपती आणि नंदी यांच्या उपस्थितीचा फोटो घरात लावल्यास सुख-शांती आणि समृद्धी लाभते. तसेच, हा फोटो पूजा स्थळी ठेवून नित्य पूजन केल्यास घरात सकारात्मकता वाढते.
- पारद शिवलिंग
भगवान शंकराची विशेष कृपा मिळवण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी पारद शिवलिंग आणणे आणि स्थापन करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की पारद शिवलिंगाच्या पूजेमुळे वास्तुदोष दूर होतो, घरात सुख-समृद्धी आणि आरोग्य टिकून राहते.
- रुद्राक्ष
रुद्राक्षाला भगवान शंकराचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी घरात रुद्राक्ष आणणे आणि त्याची विधिपूर्वक पूजा करणे अत्यंत शुभ असते. शंकराच्या कृपेने मानसिक शांती मिळते आणि मनःशक्ती वाढते. रुद्राक्षाचा 108 वेळा जप केल्यास विशेष लाभ होतो.
महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व(Maha Shivaratri 2025)
महाशिवरात्री ही केवळ एक सण नसून आत्मशुद्धी, भक्ती आणि उपासनेचा पवित्र दिवस आहे. या दिवशी उपवास केल्याने आणि भगवान शंकराची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी श्रद्धा आहे.




