हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या निकालात महाविकास आघाडीनं सगळे एक्झीट पोल फेल ठरवत दणक्यात विजय मिळवला… ४८ पैकी ३1 जागा जिंकत कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धवसेनेनं विरोधकांच्या तोंडाला पानं पुसली.. महायुतीचे नेते लोकसभेच्या पराभवाच्या धक्क्यातून अजून सावरलेलेन नसताना महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) विधानसभेच्या निवडणुकांची तयारी देखील सुरु केली आहे… लोकसभेला दाखवलेली ऐकी विधानसभेलाही आम्ही कायम ठेवणार असून जागावाटपाचा अंदाजे फॉर्मुलाही महाविकास आघाडीने ठरवल्याचं आता समजतंय.. लोकसभेच्या निकालांचा विधानसभेच्या जागा वाटपांवर मोठा इम्पॅक्ट झाल्याचंही दिसून येतंय.. त्यामुळे या व्हिडीओतून समजून घेऊयात की महाविकास आघाडीत नेमक्या कोणच्या पक्षाला किती जागा सुटतायत? जागावाटपाच्या फॉर्मिल्यात मोठा भाऊ कोण? आणि छोटा भाऊ कोण? जास्तीत जास्त आमदार निवडून आणत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी मविआचा नेमका प्लॅन काय आहे? त्याचंच हे पॉलिटीकल एनालिसीस..
लोकसभेचा निकाल लागला… निकालानुसार कॉँग्रेसनं १७ जागांवर उमेदवार दिले होते.. त्यातले १३ निवडून आले.. ठाकरेंची शिवसेना २१ जागांपैकी अवघ्या ९ जागांवर विजयी झाली.. तर शरद पवारांच्या तुतारीने १० जागांपैकी तब्बल ८ जागांवर विजयश्री खेचून आणला.. त्यामुळे शिवसेना सोडली तर महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि कॉंग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त होता… त्यामुळे विधानसभेला शरद पवार आणि कॉंग्रेसची जास्तीत जास्त जागा मिळवण्याची बार्गेनिंग पॉवर आपसूकच वाढली.. हीच सगळी आकडेमोड बघीतली तर आता १०२ + ९६ +९० चा महाविकास आघाडीचा नवा फॉर्मुला सध्या बाहेर आलाय… या फॉर्म्युलानुसार कॉंग्रेसला १०२ जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला ९६ जागा तर शरद पवारांची राष्ट्रवादी ९० जागांवर निवडणूक लढवेल… असा हा फॉर्मुला सांगतोय..
त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या निकालात चांगलाच सुळका मारणाऱ्या कॉंग्रेसला सर्वाधिक जागा तर त्याखालोखाल शिवसेना व राष्ट्रवादीला जागा सुटतील, असा अंदाज आहे… यानुसार महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटप अंतिम करण्यासाठी चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होणार आहेत. सध्या मविआतील तिन्ही पक्षांनी आपापल्या नेमक्या ताकदीचा अंदाज लावण्यासाठी अंतर्गत यंत्रणा कामाला लावल्या आहेत. ही सगळी माहिती प्राप्त झाल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकदा जागावाटपासाठी चर्चेला बसतील… तेव्हा जागावाटपाटपाटचा अंतिम आणि खरा आकडा समोर येईल…
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसला घरघर लागली होती. अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. तर पक्षात पडलेल्या फुटीमुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटाचीही अवस्था तितकीशी चांगली नव्हती. भाजपच्या बड्या यंत्रणेसमोर हे पक्ष कितपत टिकाव धरतील, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता… मात्र, मविआने ३१ जागा जिंकून युतीला घाम फोडला… त्यामुळे आता विधानसभा निवडणुकाला सामोरं जाताना मविआतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय.. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग, मुंबईतील काही भागांत काँग्रेसची ताकद आहे तिथे त्यांना जास्त जागा दिल्या जातील. कोकणासह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही भागांत उद्धवसेनेची ताकद आहे. शरद पवार गटाची पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत ताकद असल्याने त्यांना तिथल्या जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे… थोडक्यात काय लोकसभेला ज्या भागात महाविकास आघाडीच्या ज्या पक्षाने चांगली कामगिरी केली त्याच जागांवर विधानसभेलाही जास्तीत जास्त जागा सोडण्याचा प्रयत्न या जागावाटपात होईल…महाविकास आघाडीकडे सध्या असणारी आमदारांची आकडेवारी पाहिली तर कॉंग्रेसकडे ४४ आमदार तर पक्षफुटीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडे १४ तर राष्ट्रवादीकडे १४ इतक्याच आमदारांचं बलाबल आहे… थोडक्यात वर्तमान स्थितीत महाविकास आघाडीची राज्यातील ताकद ७० आमदारांच्या आसपास आहे.. पण अर्थात हा फिल्टर २०१९ च्या निकालाचा, मोदीलाट असताना आणि त्यातही दोन्ही पक्ष फुटल्यानंतरचा असल्यानं याचा सध्या रिलिव्हन्स असण्याची शक्यता तशी कमीच आहे… कारण राज्यात महाविकास आघाडी सध्या स्ट्राँग पोजिशनमध्ये आहे.. लोकसभेच्या निकालाची विधानसभानिहाय आकडेवारी बघीतली तर जवळपास महाविकास आघाडीच्या आमदारांचा आकडा हा १८० च्या घरात जातोय.. म्हणजेच येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्पष्ट बहुमतात असेल, असं म्हणत येईल..
त्यातही लोकसभेची निवडणुक राष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या मुद्दयांवर लढली जाते.. पण विधानसभेला महत्वाचे ठरतात ते स्थानिक मुद्दे.. महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार आहे. पण फोडाफोडीच्य राजकारणाने हे सरकार बनल्यानं त्याचा स्थानिक पातळीवर बराच राग आहे… या सगळ्या राजकारणाच्या गोंधळात जनतेच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी म्हणावी अशी करता आलेली नाहीये… त्यात लोकसभेला महायुतीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागल्यानं जनतेत विधानसभेसाठीही योग्य मॅसेज गेलाय… त्यामुळे विधानसभेला आपल्याला फटका बसणार असल्याचं दिसत असल्यानं महायुतीच्या विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांचीही यामुळे धाकधूक वाढलीय… हे सगळं आपल्या बाजूने प्लसमध्ये असणारं वातावरण पाहता महाविकास आघाडीने निवडणुकीच्या तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून जागावाटपाचा तीढा लवकरच हाती घेतलाय.. विशाल पाटलांच्या बाबतीत जे झालं ते विधानसभेला होऊ नये, यासाठीही जागावाटपाची बोलणी आघाडीने लवकर हाती घेतली आहेत…
बॉटमलाईन अशी की लोकसभा निकालातील यशानं हुरळून न जाता विधानसभेला फुल प्लँनिंग करुन आघाडी म्हणून एकदिलाने निवडणूक लढण्याचा मविआचा विचार आहे…. त्यामुळे खासदारकीला वाढलेला आकडा आमदारकीलाही कायम राहून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत येईल का? हे ठरवणारा जागावाटपाचा कार्यक्रम अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे..बाकी तुम्हाला काय वाटतं.. विधानसभेच्या निकालात महायुतीच्या कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील… तुमचा अंदाज काय सांगतो.. ते आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा..