धक्कादायक : महाबळेश्वरमध्ये नऊ वर्षापूर्वीच्या अत्याचार प्रकरणी दोन महिलांसह तिघांवर गुन्हा

Mahableshwer Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर | येथील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या अत्याचाराचे आणखी एक प्रकरण महाबळेश्वर पोलिस ठाण्यापर्यंत पोहचले आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर झालेल्या तक्रारीच्या आधारे महाबळेश्वर पोलिसांनी दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल केल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे.

महाबळेश्वर पोलिस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिली आहे, की 2012 मध्ये मी अल्पवयीन असताना गोरंग कालीपोदो पाल (रा. सुमन काॅटेज बंगला, वेण्णालेक जवळ महाबळेश्वर) याने माझे बरोबर माझे इच्छे विरूध्द व संमती शिवाय शारीरिक संबंध ठेवले. यासाठी मला वेळोवेळी धमकी देवून मारहाण व शिवीगाळ देखील करण्यात आली. या अत्याचारातून मी गरोदर राहीले असता मला पुण्यातील एका रूग्णालयात नेवून माझा गर्भपात देखील करण्यात आला. माझेवर अत्याचार करणा-या येथील आरती गोरंग पाल व इंदुबाई सुरेश सपकाळ (रा. सुमन काॅटेज वेण्णालेक जवळ, महाबळेश्वर) यांनी वेळोवेळी मदत केली.

या महीलेच्या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलिसांनी गोरंग पाल, आरती पाल व इंदुबाई सपकाळ या तीघां विरोधात बालकांचे लैगिंक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 4,8,12,17 तसेच भा.द.वी कलम 376, 376 तीन, 354 अ, 504,506 ,34 या कलमा नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान याबाबत वेण्णालेक परीसरातील रहीवाशांनी दिलेल्या माहीती नुसार ही महीला व आरोपी गेली नऊ वर्षे लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहुन संसार करीत होते. या दाम्पत्यांना एक अपत्यही आहे यांचे वैदिक पध्दतीने विवाह देखील झाल्याचे पोलिस सांगतात. या प्रकरणाचा तपास सहा. पोलिस निरीक्षक ए. एम. बिद्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर पोलिस करीत आहेत.