सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके
दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सध्या घाटमार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. बुधवार रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर – तापोळा रोडवर वाघेरा फाट्याजवळ मुसळधार पावसाने रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी धाव घेत पसरलेली दरड हटवले. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु झाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून या पावसाने महाबळेश्वर – तापोळा रोडवर वाघेरा फाट्याजवळ मुसळधार पावसाने रस्त्यावर महाकाय दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. या दरड कोसळण्याच्या घडलेल्या घटनेमुळे या मार्गावरील रस्त्यावर दगड, माती पसरलेली आहे. संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी घाव घेत तेथील दगड, माती हलवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.
मुसळधार पडलेल्या पावसामुळे सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाबळेश्वर – तापोळा रस्त्यावर सतत वाहनांची इजा असते. या भागात राहणारे ग्रामस्त रात्री अपरात्री या मार्गावरून ये जा करीत असतात. गुरुवारी दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.